shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चोरीची ट्रिक सांगितली नाही म्हणून येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी..!!

पुणे:-येरवड्यात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीचा प्रकार उघडकीस आला. चोरी कशी केली हे सांगितले नाही म्हणून एका कैद्याने दुसरा कैद्याला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत सोहेल शेख हा न्यायालयीन कैदी जखमी झाला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Covid-19 च्या पार्श्‍वभूमीवर येरवड्यातील हे कारागृह तयार करण्यात आले आहे. अटक केल्यानंतर न्यायालयीन कैद्यांना तात्पुरते या कारागृहात ठेवले जाते. आरोपी आणि शेख त्या दोघांनाही या कारागृहात ठेवण्यात आले होते.

यावेळी आरोपीने शेख याला तू चोरी कशी केली हे विचारले. शेख याने त्याला वारंवार सांगूनही तो वारंवार विचारत राहिला. पुन्हा एकदा विचारणा केल्यावर सांगितले नाही म्हणून त्याने त्याला मारहाण केली. शेख याच्या डोक्यात थाळी मारल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.
close