shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिठेवाडी येथे कोरोना योद्ध्यांचे घोड्यावर मिरवणूक काढून अनोख्या पद्धतीने केला सन्मान..!!

इंदापूर प्रतिनिधी: (तात्याराम पवार)
पिठेवाडी: दि. २७ नोव्हेंबर २० रोजी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल चे डॉक्टर चेतन पांडे  यांचा स्वागत व सत्कार समारंभ अचानकपणे पिठेवाडी येथे करण्यात आला. 


पिठेवाडी विजयानंद उर्फ पप्पा बंडगर त्यांच्यावर उपचार करून त्यांना सक्षम करणारे तसेच आपल्या घरची व्यक्ती समजून त्यांना भेटण्यासाठी आज सहपरिवार डॉक्टर चेतन पांडे पिठेवाडी येथे आले असताना त्यांचा अचानक टायगर ग्रुप चे उपाध्यक्ष भैया बंडगर यांनी डॉक्टर पांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे घोड्यावरती मिरवणूक काढून पिठेवाडी ग्रामस्थ व बंडगर परिवार व मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ भव्य दिव्य स्वरुपात करण्यात आला. हा सन्मान म्हणजे अनेक लोकांना मृत्यूच्या कचाट्यातून सोडणारे आणि सध्याच्या कोरोना जन्य परिस्थिती जीवाची बाजी करून अनेकांचे प्राण वाचवणारे सह्याद्री हॉस्पिटल चे डॉक्टर चेतन पांडे व सौ पांडे या कोरोना योद्ध्यांचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने दोघांची घोड्यावर मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यावेळी डॉक्टर पांडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, अचानक अनोख्या पद्धतीने केलेले स्वागत याने मी भारावून गेलो आहे .


आज मला या ठिकाणी असे वाटते की माझे घर पिठेवाडी येथे आहे. पप्पा आणि भैया हे माझ्या घरातील आहेत. माझ्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले हे माझे सौभाग्य आहे .असे प्रेम मला प्रथमच या गावात बंडगर परिवार या माझ्या कुटुंबामुळे मिळाले. यावेळी या कार्यक्रमास अनेक ग्रामस्थ मित्रमंडळी उपस्थित होते.
close