इंदापूर प्रतिनिधी:
इंदापूर: इंदापूर येथे पुणे पदवीधर मतदार संघाचे अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे जयंत आसगावकर या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता. शहा संस्कृतिक भवन इंदापूर येथे आयोजित बैठकीच्या सभेमध्ये राज्यात महा विकास आघाडी सरकार या सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून विरोधक उगाच मोकळ्या भांड्याच्या आवाजाप्रमाणे आवाज करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच महाविकासआघाडी मधील शिवसेना म्हणजे दुधात साखर असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर ,शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेंद्र काळे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत ,कवाडे गटाचे संजय सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने ,राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे इत्यादी मान्यवर यांनी आपले मनोगत भाषणातून व्यक्त केले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन शिंदे ,वसंतराव आरडे,नवनाथ रुपनवर, महादेव सोमवंशी, विठ्ठलराव ननवरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे, इत्यादी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया ताई सुळे या आपल्या भाषणात म्हणाल्या की, माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून आज पासून पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फोनची व आमंत्रणाची वाट न पाहता या निवडणुकीच्या कामाला लागून आपले मतदान चांगल्या पद्धतीने घडवून आणले पाहिजे .यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटनात्मक पद्धतीने कामाला लागावे.
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने एक वर्ष यशस्वीपणे शासन चालविले असून विरोधक उगाच मोकळी भांडी वाजवून आवाज करण्याचा प्रयत्न करीत आहेत.सत्ता गेल्याने विरोधकांना स्वप्न पडत आहेत . हे सरकार तीन महिने, सहा महिने टिकणार म्हणणाऱ्या या विरोधका पुढे, मात्र महा विकास आघाडी सरकारने एक वर्षाचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे.
इंदापूर तालुका व महाराष्ट्रात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करीत असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले .ते म्हणाले की कोरोना संपला नाही सर्वांनी काळजी घ्यावी .इंजेक्शन आले असले तरी ७०% ८०% चालेल तरी जनतेने आपली काळजी घेऊन दैनंदिन कार्य करावीत
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्य सरकारने अतिशय चांगली अंमलबजावणी केली. संपूर्ण देशात सर्वात जास्त कोरोनाची रुग्णसंख्या होती. कारण यामध्ये कसलीही लपावाछपीवी केली नव्हती. महाराष्ट्र सरकारच्या कामाची नोंद परदेशातही घेण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’हे अभियान सुरु केले. पदवीधर व शिक्षक पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक पदवीधर मतदार संघातील उमेदवारांसाठी एक एक मत महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद मतदार संघ निहाय नियोजन करुन मतदान केंद्रावर मतदान आणावे. महाविकास आघाडीचे सर्व पक्षाला बरोबर घेऊन हे नियोजन करावे. बावडा गटांमध्ये सर्वात जास्त मतदान असल्याने नियोजन करुन मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार संघातील उमेदवारांसाठी मतदान घडवून आणायचे आहे. इंदापूर शहर, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणानुसार मतदारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान इंदापूर तालुक्यात आहे. कार्यकर्त्यांनी गांभीर्याने या निवडणुकीचे काम केले पाहिजे असे आवाहन प्रदीप गारटकर यांनी केले.
तसेच काँग्रेस चे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी म्हटले की ,पदवीधर मतदार संघाचे अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर या उमेदवारांना पसंती क्रमांक एक नंबर देऊन प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष मतदान करून घेण्याचे आव्हान केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम निंबाळकर यांनी केले. तर आभार बाळासाहेब ढवळे यांनी केले.

