शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चा बुलंद आवाज पोलीस व जनसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा देणारे संघटनेत सर्वानां सोबत घेऊन चालणारे बलाढ्य व्यक्तिमत्व राज्य सरचिटणीस विकास सुसर सर यांच्या कामाचा आढावा घेतला असता त्यांचा पोलीस बॉईज असोसिएशन मध्ये सर्वच क्षेत्रात वाढते योगदान बघता त्यांची संघटनेच्या राज्य सरचिटणीस पदावरून प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रराज्य पदी निवड करण्यात आली.
सदरील निवड संस्थापक अध्यक्ष रवि भाऊ वैद्य यांच्या हस्ते मराठवाडा केसरी चे संपादक छबुराव ताके सर युवक राज्य संघटक प्रा.रवि अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निवडीबद्दल दैनिक मराठवाडा केसरी चे मुख संपादक श्री छबुराव ताके महाराष्ट्र युवक राज्य संघटक प्राध्यापक रवि अंभोरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

