shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार अपंग क्रांती संघटनेचे वतीने इंदापूर तालुका व शहर हद्दीतील अपंगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन..!!

इंदापूर दि.१२  केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांगांना राज्य व केंद्र शासनच्या योजनेचा लाभ त्वरित मिळावा यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेने इंदापूर तहसील कार्यालयासमोर आज गुरूवार (दि.१२) नोव्हेंबर रोजी आंदोलन करत घोषणाबाजी केली.यावेळी धर्मेंद्र सातव - पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, सुरेखा ढवळे महिलाध्यक्षा यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




शासन निर्यणानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाच टक्के निधी अपंग बांधवांसाठी खर्च करावा,अपंग बांधवांसाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठीत करण्यात यावी व इंदापूर तालुक्यातील अपंगांसाठी पाच टक्के निधी खर्च न करणा-या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी.संजय गांधी पेंन्शन योजना ही वयाची अट न घालता  सरसकट अपंगांना लागू करावी.जिल्हा परिवहन निर्वाह भत्ता वाटप करावे. शासन निर्णयाप्रमाणे सरसकट अपंगांना अंत्योदय योजणे चा अन्नधान्याचा लाभ मिळावा.अपंगांना विभक्त रेशनकार्ड देण्यात यावे.५ टक्के गाळे विनालिलावी वितरण करण्यात यावे.पंचायत समिती व तहसील कार्यालयावर अपंगासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात यावा यासह इतर मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत.


प्रहार अपंग क्रांती संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला इंदापूर तालुका काँग्रेसने देखील आपला पाठिंबा दर्शवत तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत,वरिष्ठ उपाध्यक्ष बिभिषण लोखंडे यांसह इतर पदाधिकारी आंदोनात सामील झाले.

close