शिर्डी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ऑक्टोबर महिन्यापासून कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी इतर देशांच्या विचार करता राज्यांमध्ये परत दुसरी कोरोनीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य सेवा संचालनालयाने राज्यातील रुग्णालये व वैद्यकीय अधिकार्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत .
कोरोनाची राज्यात जानेवारी, फेब्रुवारी मध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व शासकीय रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी तसेच नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन ही या पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी केले आहे.
या परिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भारतात व महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यापासून कोरोणाचे रुग्ण संख्या कमी झाली आहे. असे दिसून येत आहे. मात्र युरोपातील अनेक देशांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती.कोरोनाचे रुग्ण तेथे कमी होत होते. मात्र काही दिवसांनंतर झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत जात आहेत .त्यामुळे काही देशात परत लॉकडाऊन करावा लागत आहे. अशी परिस्थिती काही देशांमध्ये निर्माण झाली आहे.तेथे ही कोरोनाची दुसरी लाट आली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही त्या धर्तीवर जानेवारी फेब्रुवारी मध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून पूर्णतयारी त्या संदर्भात आगोदरच करण्यात येत आहे. सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
ऐनवेळी कोरोनाचे रुग्ण,त्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली तर, दुसरी लाट आली तर परवड होऊ नये, त्यासंदर्भात अधिक नियोजन करणे आवश्यक आहे.जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.तसेच अधिक जनसंपर्क असणाऱ्या व्यक्तींपासून कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ शकतो .त्यामुळे छोटे व्यावसायिक, घरपोच सेवा देणारे, वाहतूक करणारे, अशांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसेच सध्या हिवाळा सुरू झाला असून थंडी वाढली आहे. त्यामुळे या काळात फ्ल्यु सदृश्य रुग्णांवरही अधिक आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळाही तयार ठेवणे आवश्यक आहे. अशा सर्व सूचना आरोग्य संचालनालय पुणे यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहे.

