पत्रकारिता क्षेत्रातील एक हिरा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, नवोदितांचे मार्गदर्शक,निर्भीड आणि ज्यांची लेखणी नेहमीच अनेकांना दिशादर्शक ठरते असे साहेबराव सोनकांबळे त्यांचा आज वाढदिवस ...
खरं तर ज्यांची उभी हयात समाजाचं प्रतिबिंबित्व उमटवण्यात जाते, वृत्तपत्रात काम करताना अनेकांचे वाढदिवस साजरे करताना ज्यांच्या लेखणीतून व्यक्तिमत्व रेखाटली जातात , त्या पत्रकाराचा वाढदिवस किंवा त्याच्या बद्दल समाजात आजही फारस कोणी बोलत नाही. पण समाजाच्या मनात कायम घर करून राहणाऱ्या खऱ्या पत्रकाराचे अढळ स्थान मात्र कुणी कधीच हिराऊ शकत नाही हे देखील सत्य आहे.मी साहेब यांना गेली अनेक वर्षांपासून ओळखतो.परिसरात त्यांची दांडगी ओळख पण त्या काळच्या सामना या दैनिकातून त्यांना मी वाचत होतो. अलिकडे विपुल बोंमनाळीकर यांच्याकडून त्यांची जवळकी झाली अन मित्रत्व वाढत गेलं.
पत्रकारिता ही एक अशी प्रणाली आहे की यात काम करणाऱ्या माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन व ज्ञानदान संपत नाही,खरेतर साहेब यांच्या पत्रकारितेने तालुका अनेक वर्ष गाजला आणि गाजतो ही आहे.प्रचंड अभ्यास,पत्रकारितेत उच्च शिक्षण,नव्या विषयाचा अभ्यासुपणा, शिक्षण,शेती , सहकार,सामाजिक बांधिलकी, प्रशासन , राजकारण. ते आपल्या परिसरातील मातीतले काय गुणधर्म इथपर्यंत ते हजारो वर्षांचा इतिहास काय सांगतो ? याचं चालतं बोलतं विद्यापीठ त्यांच्यात ठासून भरलेल आहे.
वयाच्या 17 व्या वर्षांपासून पत्रकारितेच्या झनझावतात या माणसाने लेखणीला मोठी धार आणली. खंडोबा मंदिरांची ओळख असो दुष्काळाची दाहकता , प्रशासनातील अधिकाऱ्यांवरचे आसूड असोत अथवा राजकारण्यांची केलेली चिरफाड असो, अनेक वार्तापत्रे , विविध विषयावरचे लेखन हे नेहमीच चर्चेचे विषय ठरले आहेत.यापुढे जाऊन सांगायचे तर ग्रामीण भागात पत्रकारिता करणारा हा माणूस नेहमीच निकोप आणि दर्जेदार लिखाण करीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अशा वेगळ्या विषयाच्या संकल्पना लिहिणारा व रुजवणारा हा पत्रकार !
साहेब यांच्या व्यक्तिमत्ववात अनेक वैशिष्ट्य दडलेली आहेत .निसर्गावर अपार प्रेम करणारा आणि निसर्गप्रेमी हा पत्रकार आहे . माती, दगड, गोटे, अनेक गावातील पाणी चळवळ , दुष्काळ यावर संवेदना बाळगणारा हा माणूस. कधी पाणी परिषद तर कधी अवैध धंदे विरोधात उपोषण तर कधी ग्रामीण पत्रकार यांच्या उन्नतीसाठी नवे विषय समोर ठेवणे, गरीब, दुःखी पत्रकारांना मदत करणे, दवाखान्यात दाखल करणे असो की गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजातील मुलांचे शिक्षण असो असे अनेक उपक्रमात सहभाग.'ग्रामीण भागातील कौलारुचे घरे नामशेष होण्याच्या मार्गावर' या बातमीची दखल अनेकांनी घेतली.दक्षित भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेतील तमाशातील लावणीला आपल्या लेखणीतून लावणीचा शृंगार, वगनाट्यायातील नाटकाचा प्रसंगवर्णन आणि त्यासोबतच कलावंताचे शासन दरबारी रखडलेले प्रश्न व शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून कलावंताची होत असलेली हेळसांड आपल्या परखड लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न केला.पत्रकारितेतील लोक नेता म्हणून परिसरात ओळख निर्माण केली.
वास्तविक पत्रकार हा आगोदर एक माणूस आहे , त्याच्या सुख-दुःखात एकीचे बळ एकवटले पाहिजे. तशी भावना सगळ्यांमध्ये रुजायला हवी, कारण ती काळाची गरज आहे.
साहेब अण्णा यांना वाढदिवसानिमित्त खुप सार्या शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य,आरोग्य लाभो मनस्वी सदिच्छा...!मुरलीधर थोटे
कंधार 9890274412

