shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदेड दक्षिणचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांची आ. शामसुंदर शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट..!!



लोहा । प्रतिनिधी :
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी काल सोमवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली, यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन आ. मोहन अण्णा हंबर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी आ. मोहन अण्णा हंबर्डे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी लोहा ,कंधार मतदार संघातील विविध विषयावर व प्रलंबित विकास कामावर सखोल चर्चा केली, यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शिंदे व आ. हंबर्डे यांच्या हस्ते श्रीकांत पवार यांच्या बालाजी इलेक्ट्रिकल शॉप चे फित  कापून उद्घाटन करण्यात आले

.

यावेळी हंसराज पाटील बोरगावकर, पं. स. सदस्य श्रीनिवास मोरे श्याम, श्यामअण्णा पवार, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, पंकज परिहार, माधव पाटील घोरबांड ,सुधाकर सातपुते ,सचिन कल्याणकर,सुधाकर सातपुते,प्रसाद जाधव सह कार्यकर्ते सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.
close