(कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज)
हिंगोली। प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)
दि.२३,यंदा अतिवृष्टीमुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आणि बळीराजाची अवस्था फार बिकट झाली आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.सोयाबीन पिकाला लागवड केलेला खर्च हि वसून झाला नाही बळीराजाच्या आता सर्व आशा तूर पिकावर आहेत परंतु मागील चार दिवसा पासून सेनगाव तालुक्यातील साखरा,हिवरखेडा,हत्ता कापडशिंगि,बोरखेडी,खडकी धोतरा,सेनगांव या सह आदी गावामध्ये ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकांची मोठ्या प्रमाणत फुल गळती होत आहें व अळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे व तसेच जागीच तुरीचे झाडे वाळत आहेत या बाबतीत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शनाची गरज आहें मात्र कृषी विभागकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.सोयाबीन पीक हातचे गेल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या संसाराच्या गाड्याची मदार आता तुरीच्या पिकावर होती सेनगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिवाळी हा सण काळा सण ठरला आहें कारण अनेक शेतकरी ढगाळ वातावरणामुळे चिंताग्रस्त झाले आहेत.
सोयाबीन नंतर आत्ता सर्व आशा हि तुरीच्या पिकावर होती पण अचानकपणे वातावरणातील बदलाचा फटका तूर पिकाला बसत आहे विशेष म्हणजे सोयाबीन पिंकाप्रमाणे तूर पीक हे हळूहळू हातचे जात आहें रासायनिक खते किटकनाशके यांचे भाव तर गगनाला भिडले आहेत या ढगाळ वातावरनामुळे मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झारा आहे किंडाचा व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हजारो रुपयांचे औषधी फवारणी करावी लागत आहे आधीच सोयाबीन हातचे गेले असतांना शेतकरी राजा हतबल जाला आहे आता तूर पीक हातचे जाण्याच्या मार्गावर दिसत आहें अद्याप हि सोयाबीचे नुकसान झालेल्याची मदत देखील मिळाली नाही आणि आता तूर देखील हातचे जाते कि काय हि चिंता बळीराजाला लागली आहे.गेल्या दोन दिवसा पासून ढगाळ वातावरणमुळे तुरी वर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झा आहें सध्या शेतकऱ्यांच्या हातचे सोयाबीन पीक तर हातचे गेले आहें आता जी काही आशा होती ती तुरीवर होती पण निसर्गाच्या लहरीपना मुळे हाताशी आलेले तूर पिक देखील हातचे जाते कि काय हि चिंता शेतकरी वर्गाला लागली आहें तुर पीकावरील काही प्रमाणात किडा साठी कडाख्याची थंडी लाभदायक ठरते हरभरा गहू पेरणी ला देखील थंडी आवश्यक असते परंतु गेल्या दोन दिवसा पासून थंडी गायब झाली आहे.

