shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट झाल्याशिवाय शाळेत त्यांना पाठवायचेच कसे? तालुक्‍यातील पालकांचा सवाल...



संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप) :
विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट झाल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे ? असा सवाल संगमनेर मधील पालकांनी केला  आहे.

२३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू होत आहे. हे आदेश प्रशासनाने दिला आहे. मात्र गावा गावामध्ये पालकांच्या बैठका झाल्या. मात्र विद्यार्थी शाळेमध्ये येतील पण त्यांच्या कोरोना टेस्ट झाल्याशिवाय त्यांना  पाठवायचं कसं?  असा सवाल पालकांनी उपस्थित केल्यामुळे विद्यार्थीवर्गात  संभ्रम निर्माण झाला आहे. 

शासनाने आमच्या पाल्याची जबाबदारी घ्यावी. आमची काहीच  हरकत नसणार. काही विद्यार्थी कोरोना काळा मध्ये बाहेरगावी गेले होते. मग त्यांच काय? जर मुख्यमंत्री; शिक्षणमंत्री जर आमच्या पाल्यांची जबाबदारी घेत असतील तर आम्ही त्यांना शाळेत पाठवू ..!! नाही तर 
आम्ही नुसते संमती पत्र वर आमच्या पाल्यांना शाळेत पाठवणार नाही. असे संगमनेरमधील पालकांचे म्हणणे  आहे. यावर तोडगा काय निघतो पाहुया..!!
close