shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

...जेव्हा खासदार हेमंत पाटील घेतात खिचडी - मूगभज्यांचा आस्वाद..!!



हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१६,दिवाळीची खरेदी करणाऱ्यांची  आणि येणाऱ्या हॉटेल मध्ये पोटात काहीतरी टाकून जाणाऱ्यांची वर्दळ, हॉटेल मालक आणि नौकर घाई गडबडीत असताना अचानक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांनी हॉटेल मालक शंकर  साहू यांच्या प्रसिद्ध मूग भजे हॉटेलला भेट देऊन मालक आणि कामगारांसोबत बसून हॉटेल मधील खिचडी -भज्यांचा आस्वाद घेतात आणि सर्वांना सुखाचा धक्का देऊन अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. 

          
हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सर्व सामान्य लोकांना भेटून त्यांच्या घरी फराळ करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करत आहेत. 
   
 
कसबे धावंडा ,येहळेगाव(तु) येलकी, हिंगोली, औंढा नागनाथ, शिरड शहापूर, वाजेगाव अश्या अनेक ठिकाणी खासदार हेमंत पाटील भेटी दिल्या.
    
याच दरम्यान त्यांनी आज (दि.१६) हिंगोली मधील प्रसिद्ध मूग भजे हॉटेलला भेट दिली, हॉटेलचे मालक शंकर साहू आणि त्यांचे कामगार ग्राहकांना सेवा देण्यात मग्न असताना व हॉटेलमध्ये ग्राहकांची नाष्टा करण्याची घाई !याच घाईगडबडीत खासदार हेमंत पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये दाखल झाले. मग कोणीतरी म्हणाले ,"अहो खासदार साहेब आलेत ". यावेळी हॉटेल मालक आणि सर्वांची एकच घाई झाली . खासदार हेमंत पाटील साहेबांना "कुठे ठेवू, अन कुठे नको" अशी परिस्थिती लक्षात आल्यावर खासदार हेमंत पाटील यांनीच सर्वांना सुखद धक्का देत आणि कोणताही बडेजाव न करता गरमा-गरम मूग भज्यांची ऑर्डर देऊन सर्वांना सोबत घेऊन सर्वांसोबत खिचडी-भज्यांचा आस्वाद घेतला. 
   

खासदार हेमंत पाटील यांचा हा साधेपणा सर्वांनाच आनंद आणि सुखद धक्का देणारा होता. यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की, तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या हॉटेलातील खिचडी-भजे  खूपच स्वादिष्ट आणि रुचकर आहेत. तुमचा व्यवसाय वाढला तरी स्वाद मात्र तोच आहे आणि पुढेही कायम राहील. खासदार हेमंत पाटील यांचा हा साधेपणा, आपुलकी व  प्रेम पाहून  ग्राहक सुद्धा आनंदीत झाले. यावेळी हॉटेलचे मालक शंकर साहू म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांचे आमच्यावर नेहमीच प्रेम आहे."खासदार येती घरा तोचि आमचा दिवाळी अन दसरा ." 
     
खासदार हेमंत पाटील यांच्या  अचानक भेटीची मात्र हिंगोली शहरात दिवसभर चर्चा होती. यावेळी त्यांच्यासोबत दिलीपभाऊ बांगर ,लखनभैया कुरील, निलेश साहू ,अनिकेत साहू , शंकरलाल साहू ,सूरज पुरोहित ,विक्रम कुरील, पुरन कुरील,शिवम साहू,स्वप्निल भण्डारल्लु,आशु सिंगाड़े, बाबूराव सुकटे,संदीप पुरोहित आदी उपस्थित होते.
close