shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांवात भरदिवसा एका इसमावर प्राणघातक हल्ला..!!

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातील नागरीक माराती बिडकर वय अंदाजे ५० यांच्यावर दि.२२ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी पावने एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चाकुने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून सेनगांव शहरात एकच खळबळ उडाली आहे.


सेनगांव शहरात पोलीस स्टेशन च्या पाठीमागील शंकरनगर मध्ये मारोती बिडकर हे आपल्या घर बांधकामावर असतांना भरदिवसा पावने एकच्या सुमारास अचानक तिन अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आले होते त्यातील एका व्यक्तीने मारोती बिडकर यांच्या पोटावर चाकुने हल्ला केला.परंतु बिडकर यांनी क्षणाचा ही विलंब न करता पोटावरील वार मांडीवर घेतल्याने ते बालंबाल वाचले परंतु चाकुचा मार त्यांच्या मांडीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.त्यांचा ओरडण्याचा आवाज त्या नगरातील बाळासाहेब उफाड यांनी ऐकता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता अज्ञात हल्लेखोरांनी तेथुन पलायन केले.

बाळासाहेब उफाड व नातेवाईकांनी गंभीर जखमी बिडकर यांना सेनगांव शहरातील डाँ.मनोज साबु यांच्या दवाखान्यात दाखल केले तेथे डॉ.साबु यांनी प्राथमिक उपचार करुन सेनगांव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. गंभीर जखमी झालेले बिडकर यांना ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी ताबडतोब हिंगोली येथे दाखल करण्यास सांगितले.हि घटना समजताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,काँग्रेसचे माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन गंभीर जखमी असलेले बिडकर यांची चौकशी करुन अँम्बुलन्स गाडीची व्यवस्था करुन गंभीर जखमी असलेले बिडकर यांना पुढील उपचारासाठी हिंगोलीला पाठविण्यास मदत केली.यावेळी सेनगांव शहरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.विशेष म्हणजे हि घटना दिवसाढवळ्या व पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.बातमी लिहीपर्यंत या प्रकरणी अद्याप ही अज्ञात हल्लेखोरावर सेनगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.नेमका हा हल्ला कोणत्या कारणाने झाला व का झाला या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे.
close