shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाविर आसबे यांनी महा ई सेवा ग्रामीण भागात सुरु करुन ग्रामीण भागातील कामकाजास चालना दिली... युवा नेते अमोलराजे इंगळे...!!


इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर दि.११/११/२०२० इंदापूर तालुक्यातील  बाभुळगांव मध्ये महा ई सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून दि.10 नोव्हेंबर रोजी युवा नेते अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते त्याचा उद्घाटन करण्यात आले. 


यावेळी  विकास सोसायटी चेअरमन दिपक गुरगुडे,  तंटामुक्त अध्यक्ष सोमनाथ जावळे, बंडू जाधव, सुनिल राखुंडे, सुनिल गुरगुडे, बापू उंबरे, राहूल भोसले, सचिन जगताप, गणेश शिद, गोविंद जगताप, नारायण आसबे,विठ्ठल गुरगुडे, महादेव लोंढे आदी उपस्थित होते.

या वेळी अमोल इंगळे म्हणाले की महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची शासकीय प्रमाणपत्रे, परवाने, शेतकऱ्यांना लागणारी कागदपत्रे व इतर सेवा प्रदान केल्या जाणार आहेत.  या केंद्राच्या माध्यमातून ७/१२ चा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे नागरिकांना प्राप्त करता येतील. त्यामुळे आता यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया करताना वेळेचीही बचत होणार आहे.

महाविर आसबे यांनी ही महा ई सेवा ग्रामीण भागात सुरु करुन ग्रामीण भागातील कामकाजास  चालना दिली आहे. महावीर आसबे हे अत्यंत हुशार व चांगला शिकलेला सुशिक्षित तरुण असून त्यांनी नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यावर त्यांचा अधिकचा भर आहे.मी त्यांचे अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांनी जास्तीत जास्त वेळ या केंद्रास देऊन नागरिकांना समाधानकारक सेवा द्यावी अशी मला आशा आहे असेही ते म्हणाले.
close