पारोळा येथील धक्कादायक घटना, संशयिताचाही आत्महत्येचा प्रयत्न..!!
पारोळा :- प्रमोद चौधरी
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी येथील एका चर्मकार समाजाच्या वीस वर्षाच्या तरूणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला विष पाजून ठार केल्याचा आरोप पीडीत तरूणीच्या नातेवाईकांतर्फे करण्यात आला आहे या घटनेतील तरुणीचा मृत्यू झाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पारोळा शहरातील एक तरुणी बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिची पारोळा पोलिस स्टेशन येथे मिसिंग नोंद दाखल करण्यात आली परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ती बेशुद्धावस्थेत पारोळा बस स्टँड परिसरात नातेवाईकांना आढळून आली.नातेवाईकांनी वैद्यकीय उपचारार्थ तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल केले तिच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे उपचार घेत असताना तिची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे पारोळा शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याठिकाणी चर्मकार संघाचे पदाधिकारी भानुदास विसावे, सामाजिक कार्यकर्ते पिरन अनुष्ठान यांनी पारोळा पोलीस स्टेशनला भेट देत पोलिस निरीक्षक कानडे यांची भेट घेऊन या घटनेतील दोषी गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी,त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली.
मृत पिडीत तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला विष पाजून ठार केल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस स्टेशनला धाव घेतली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पिडीत मृत तरूणीचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्याकामी पारोळा पोलिस स्टेशन येथे हजर होते.
दरम्यान या घटनेने संपुर्ण पारोळा शहरात एकच खळबळ माजली असून मृताच्या नातेवाइकांनी संशयितांना किंवा दोषी असतील त्यांना ताब्यात घेऊन योग्य ते शासन करावे अशी मागणी पारोळा पोलीस स्टेशन येथे केली आहे.पीडित तरुणीने मृत्यू पूर्वी दिलेल्या जबाबात आपल्या मामा व आईस दिलेल्या माहितीत ३ पुरुषांसह एका महिलेचा उल्लेख केला परंतु त्या महीलेचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसून एकूण ४ आरोपीं पैकी ३ संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी १ महिला आरोपीचे गूढ मात्र कायम आहे.या घटनेतील एकूण आरोपींपैकी २आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी शिवनंदन शालीक पवार,अशोक वालजी पाटील,पप्पू अशोक पाटील या तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत. तसेच शिवनंदन पवार या संशयीताने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
त्याच्यावर धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून तेथे सुद्धा पोलिस बंदोबस्त ठेवलेला असून या प्रकरणी लवकरच दोषींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
असेही कानडे यांनी सांगितले.यावेळी पारोळा पोलिस स्टेशन च्या परिसरात मृताचे नातेवाईक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

