इंदापूर शहरात शिवसेना शाखेचे ऑनलाईन उद्घाटनासह शेकडो युवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश...
इंदापूर प्रतिनिधी:दि ११, इंदापूर येथे (दि.१०) झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा संपर्क प्रमुख सत्यावान उभे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे , जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, उपजिल्हा प्रमुख संजुभाऊ काळे, तालुका प्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी आदी पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या उपस्थित शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
त्यापूर्वी शिवसेना इंदापुर तालुक्याच्या वतीने
शेटफळ हवेली , सुरवड, वकिलवस्ती ,भोडणी या ठिकाणी दीपावली निमित्त गरजू नागरिकांना फराळ वाटप करण्यात आले.
इंदापुर येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यामध्ये नवीन पदाधिकारी यांच्या निवडीचे पञ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले त्यामध्ये अजित रामदास रेडके विधानसभा क्षेत्र प्रमुख ,योगेश वामन वाघमोडे प्रसिद्धीप्रमुख , बापूराव लक्ष्मण गायकवाड भिगवण -शेटफळगडे उपतालुका प्रमुख जि.प.गट, संदीप भगवान चौधरी बावडा -लाखेवाडी जि.प. गट उपतालुका प्रमुख ,सुदर्शन दादासो साखरे निमसाखर-निमगांव जि.प गट उपतालुका प्रमुख,जयदीप उद्धव कदम विद्यार्थी सेना इंदापुर तालुका अधिकारी, तुषार हनुमंत दळवी उपविभाग प्रमुख निमसाखर पंचायत समिती गण ,विशाल सुरेश यादव उपविभाग प्रमुख शेटफळ गढे पंचायत समिती गण , अनिल जालिंदर मोरे उपविभाग प्रमुख सुरवड गण, लक्ष्मण दशरथ साळुंखे उपविभाग प्रमुख कळंब पंचायत समिती गण , दशरथ नवनाथ राखुंडे उपविभाग प्रमुख पळदेव पंचायत समिती गण , तसेच इंदापुर शहरातील अनेक तरुणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी बारामती लोकसभा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख ॲड. राजेंद्र काळे, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ काळे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, मा.तालुकाप्रमुख योगेश कणसे, माथाडी कामगार सेनेचे दुर्वास शेवाळे, उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब डोंगरे, धोंडिराम सोनटक्के, विभागप्रमुख विजय तरंगे, अंकुश गलांडे,विजय गायकवाड, यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांचे नियोजन तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी केले होते.
इंदापूर : शिवसेना इंदापूर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील चार हजार निराधार, अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दीपावली निमित्त फराळ वाटप करतांना , दुसय्रा चित्रामध्ये इंदापूर शहरात शिवसेना शाखेचे ऑनलाईन उद्घाटनासह शेकडो युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तो क्षण व इतर मान्यवर . (छाया : कैलास पवार )

