अंबाजोगाई(प्रतिनिधी)
दि.२४,युवासेना कार्यकारणी सदस्य तथा बीड जिल्हा विस्तारक अंकीत सुनिल प्रभु यांच्या वाढदिवसानिमित्य अंबाजोगाई येथील मनोरूग्ण,फिरस्ती गोरगरीब व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप युवासेनेचे विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांच्या वतीने करण्यात आले असुन. सध्याचा हिवाळ्याचा थंडीचा ऋुतु पाहता गारव्या पासुन बचाव होण्यासाठी अवश्यक असलेल्या ब्लॅंकेटचे वाटप गरजु फिरस्ती व मनोरूग्न यांना अंकीत प्रभु यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन करण्यात आले. आशा गोरगरीब फिरस्ती व्यक्ती व मनोरूग्न हे कडाक्याच्या थंडीत रात्री रस्त्यावर थंडीने कडकडत झोपलेले असतात म्हणुन तेहि मानव असुन मानुकीच्या नात्याने आशा व्यक्तींची या थंडीपासुन बचाव होण्यासाठी युवासेनेच्या विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी हे समाजपयोगी सामाजिक कार्य करून अंकीत प्रभु यांचा वाढदिवस या गोरगरीब व्यक्तींचा आशिर्वाद घेऊन साजरा केला अाहे.
या विशेष सामाजिक बांधीलकी मानवजातीच्या समाजात अशा दिनदुबळ्या लोकांना मदत करून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाकुन एक समाजउपयोगी कार्य करून चांगला आदर्श समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न अक्षय भुमकर व त्यांच्या सहकारी पदाधिकार्यांनी केला असुन हेच या गोरगरीब दिनदुबळ्या लोकांचे आशिर्वाद अंकीत प्रभु यांना पाठबळ चांगले समाजउपयोगी कार्य त्यांच्या हाथुन घडण्याचे या कार्यातुन त्यांना मिळतील अशा भावना अक्षय भुमकर यांनी व्यक्त केल्या.
हा कार्यक्रम शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, संपर्कप्रमुख आनंदजी जाधव,युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई,विस्तारक अंकीत प्रभु, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहिर,केज विधानसभा संपर्कप्रमुख परशुराम जाधव,तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असुन या कार्यक्रमास युवासेना तालुकाप्रमुख सुदर्शन निकम,शिवसेना शहर समन्वयक अर्जुन जाधव,युवाउपशहरप्रमुख दिनेश उपरे,अमित परदेशी, अमोल वैष्णव आदी उपस्थित होते.

