shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगावकेतकी बीट चे नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मुगळे यांनी कौठळी शाळेला दिली भेट..!!

कौठळी :दि.२५ नोव्हेंबर२०२० रोजी निमगाव केतकी बीट चे नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मुगळे यांनी जि. प. प्राथ. शाळा कौठळी या शाळेला अचानक भेट दिली.त्यांच्या सोबत व्याहाळी व काटी केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी आजबे हे देखील उपस्थित होते.सुनील मुगळे यांनी ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण कसे चालू आहे याचा आढावा घेतला.ऑनलाईन अभ्यासाबरोबर ऑफलाईन कृतीपत्रिका देखील मुलांना देऊन सोडवून घेतल्या आहेत त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक केले.पंचायत समिती आयोजित ऑनलाईन टेस्ट चे गुणनोंद रजिस्टर पाहून समाधान व्यक्त केले.वादळामध्ये शालेय इमारत पडलेली आहे त्याची देखील पाहणी केली व  पालकांशी चर्चा केली.*

            
शाळेच्या वतीने नवनियुक्त विस्तार अधिकारी सुनील मुगळे यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी केला.
 

तर केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेबांचा सत्कार भारत ननवरे सरांनी केला.यावेळी    बांडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष हेगडे,अंगणवाडी सेविका राजेश्री मोरे,सारिका पाटोळे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले तर आभार भारत ननवरे यांनी मानले. अशी माहिती भारत ननवरे यांनी दिली
close