shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या विभागीय कार्यकर्ता बैठकीत शिक्षकांच्या प्रश्नांवर लढा उभारणार..!!


सावळीविहीर( प्रतिनिधी ) :
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या नाशिक विभागीय कार्यकर्ता बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आगामी काळात लढा देण्याचा निर्धार मान्यवरांनी केला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाची उत्तर महाराष्ट्र (नाशिक) विभागीय कार्यकर्ता बैठक २२ नोव्हेंबर रोजी राहाता येथे झाली. सकाळी पहिल्या सत्रात संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून संघटनेचे राज्य संघटनमंत्री (नांदेड) सुरेश दंडवते यांनी संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्यांची कार्यशैली कशी असावी, कार्यकर्त्यांच्या अंगी कुठले गुण असावेत, कार्यकर्त्यांनी आपले व्यक्तिगत  चरित्र कसे घडवावे, संघटनेच काम कसे करावे, 

यावर तसेच  संघटनेमधील पदाधिकारी, संघटनेची ध्येयधोरणे, उद्दिष्टे तसेच कार्यकत्यार्ची कार्यशैली कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले.प्रथमदुसऱ्या बौद्धिक सत्राचे अध्यक्ष संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले होते. प्रमुख वक्ते राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी संघटनांचे आंदोलन, प्रशासकीय बाबींचा अभ्यास कसा असावा, आपले प्रश्न कशा पद्धतीने मांडावेत यावर मार्गदर्शन केले.

राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. भविष्यात प्रलंबित प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावावीत, तसेच वेतन प्रणाली, जुनी पेन्शन, मुख्यालयी राहण्याचा प्रश्न, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदे सरळ पदोन्नतीने शिक्षकांतून भरणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे प्रश्न, जीपीएफची प्रकरणे,शिक्षकांना वेतन वाढ, जिल्हा बदली शिक्षकांचे विविध प्रश्न ,शिक्षकांचे जॉब कार्ड अशा प्रश्नांवर प्रकाश टाकला.

दुपारच्या सत्रात मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक आमदार संजय केळकर होते. यावेळी प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे,  आदर्श शैक्षणिक समूह पनवेलचे चेअरमन धनराज विसपुते, राहाता पंचायत समितीचे सभापती श्री.ओमेश जपे, राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, राज्य संघटनमंत्री सुरेश दंडवते, राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले गुरुजी राज्य संपर्क प्रमुख, दिलीप पाटील, राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, राहाता  गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शेळके यांनी, तर स्वागत जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी केले.धनराज विसपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय केळकर यांनी  त्यांचा सत्कार केला.

अध्यक्षीय भाषणात आमदार संजय केळकर म्हणाले की, शिक्षकांच्या न्याय हक्क, प्रश्नांसाठी लढणारी संघटना म्हणून महाराष्ट्रात अल्पावधीतच सर्व शिक्षकांच्या मनात रुजलेली संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग परिचित आहे. आपण चांगले काम करतो म्हणून चांगले लोक आपल्या सोबत येत आहेत. यापुढेही अनेक लोक आपल्या सोबत येतील.आपली संघटना राष्ट्रहित, शिक्षण व शिक्षकहित जोपासणारी आहे.

कार्यक्रमास संगमनेर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी धावती भेट दिली. तसेच पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन व इतर अन्य राजकीय व सामाजिक पदाधिकारी यांनीही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.बैठकीचे संचालन सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे  व सहसंचालन रविकिरण पालवे यांनी केले. मेळाव्याचे  सूत्रसंचालन दत्ता गायकवाड, गणेश पिंगळे, दत्तात्रय गमे  यांनी केले. 

संजय शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, विकास डावखरे,आर पी राहणे,संजय शिंदे,कैलास दौंड, मिनाक्षी तांबे,बाबा गोसावी,दत्तात्रय गमे, राजेंद्र थोरात,मनोहर वहाडणे ,सुरेश बागुल,राहाता तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड, संजय वाघमारे,विनोदतोरणे , शांताराम शेळके,रामकीसन असावा,अविनाश साठे,बबन भालेराव, दीपक अहिरे,फेसबुक व यूट्यूबवर लाईव्ह कार्यक्रम करणारे राजू बनसोडे सर, अप्रतिम रांगोळी काढणारे चित्रकार संदिप वाघमारे , तसेच  ,संजय वाघमारे, सुधाकर अंत्रे, पंकज दर्शने,ज्योती पवार,चंद्रकांत महानडुळे, वैशाली सोनवणे, वैशाली नाईक,अनिता माळी,व इतर पदाधिकाऱ्यांनी ,शिक्षकांनी परिश्रम घेतले.  
close