टेंभुर्णी (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डूवाडी येथील तीन विद्यार्थी जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक ठरले .
इयत्ता पाचवीतील १६ पैकी १४ विद्यार्थी पात्र तर इयत्ता आठवीतील ५ पैकी ४ विद्यार्थी पात्र ठरले होत.यातील इयत्ता ५ वी तील कु.ओम शिवराज वायचळ २२६ गुण जिल्हास्तर १२२ वा क्रमांक,
सार्थक सतीश बरडे २२६ गुण जिल्हास्तर १३१ वा क्रमांक,इ ८ वी तील जीयरा जयदीप बहिरशेट २३२ गुण जिल्हास्तर ७७ वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष शिवराज वायचळ, सचिव अजित वायचळ, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,प्रशासन अधिकारी महेश पवार, मुख्याध्यापिका सारिका गोटे यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सारिका गोटे, प्रदीप देशपांडे, गीतांजली शिंदे,जयंत माळी, आकाश घोडके, किशोर मोहोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

