shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"शिर्डी एक्सप्रेस" चे संपादक रमेश जेठे सर यांना वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स म्हणून केले सन्मानित..!!



इंदापूर । प्रतिनिधी( तात्याराम पवार):
नगर तालुक्यातील देहरे गावचे व शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश सखाराम जेठे यांनी विद्यार्थ्यीदशेपासून सामाजिक कार्यात आपल्याला वाहुन घेतले. सामाजिक कार्याचे अतिशय वेडलागल्यामुळे एम. ए. बीएड.असे उच्च शिक्षित असूनही नोकरी न करता सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले. या कार्यातून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केल्याचे त्यांच्या एकूण कामावरून दिसते.
                    श्री.रमेश जेठे सर

सध्या जगामध्ये पसरलेल्या कोरोना महामारी च्या काळात भारतामध्ये जी जनसेवा केली आहे. त्यावर रमेश जेठे सर यांचे कार्य विशेष गौरव पूर्ण आहे. त्यांच्या या कार्याची योग्य दखल घेऊन जागतिक संविधान व संसदीय संघ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. ग्लेन मार्टिन, डॉ. दत्ता विघावे अध्यक्ष महाराष्ट्र, श्रीरामपूर सेंटर यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले.

               धान्य किट तयार करताना 

रमेश जेठे सर यांनी कोरोना काळात देहरे येथे गरीब मजूरांना  ३४५ लोकांना धान्याचे किटचे वाटप केले. तसेच महाराष्ट्र भर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत व स्वत: धान्य किटचे वाटप केले. बांधकाम कामगार मजूरांना शासनाकडून मदतीसाठी पाठपुरावा. संजय निराधार योजनेचे पैसे वितरित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा. 

     मजूरांना धान्य किट वाटप करताना 

गरीब मजूरांना रेशन मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा..अडकलेल्या मजूरांना आर्थिक सहकार्य व शासकीय अधिकारी यांना भेटून  मुंबई, ठाणे, पुणे येथील कामगारांना गावी पाठविण्याची व्यवस्था केली.. अनेक  हाॅस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्थांची भेट घेऊन हाॅस्पिटलचे बिल कमी करण्यासाठी सहकार्य केले, अनेक शासकीय योजनां राबविण्यासाठी शासनाकडे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे व इतरांच्यामार्फत अविरत पाठपुरावा केला. कोरोना पेशन्टला अडचण  येऊ नये यासाठी रस्ते दुरूस्ती साठी सार्वजनिक बांधकाम विभागा कडे पाठपुरावा करून रस्ते दुरूस्ती करून घेतले.रक्तदानासाठी अनेकांना प्रवृत्त केलं. पेशन्टला रक्त मिळवून दिले. सात महिने न्यूज पेपर व न्युज पोर्टल मधून कोविड बद्दल मोफत माहिती प्रसारीत केली.
    आमदार निलेशजी लंके यांचे हस्ते सत्कार 

आजही  जनतेच्या हितासाठी माहिती व मार्गदर्शन त्यांच्यामार्फत मोफत दिले जाते. अशी सामाजिक जबाबदारी पार पडणारे रमेश जेठे सर यांचा सन्मान जागतिक स्तरावरील, जागतिक संविधान व संसदीय संघ, यांच्यामार्फत प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करणे हा गौरव पूर्ण आहे. 

निर्भिड पञकार म्हणून सन्मान करताना मा.किशोर विटकर

त्यांच्या या सन्मानाचे अनेक स्तरावरून अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे. "शिर्डी एक्सप्रेस" च्या माध्यमातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक प्रश्ना वरती आवाज उठवून सडेतोडपणे प्रश्न सोडणारे निपक्ष, निर्भीड असे निर्व्यसनी संपादक रमेश जेठे सर म्हणून महाराष्ट्रात व देशात त्यांचे नाव लौकिक आहे. त्यांना जागतिक संविधान व संसदीय संघ या जागतिक स्तरावरील संघटनेने सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

श्री. तात्याराम पवार
 इंदापूर.
close