प्रतिनिधी । मोहन शेगर :
अकलूज :मु.पो.पानिव, ता. माळशिरस येथिल संभाजी महादेव बाबर वय ४० या इसमाचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत गिरझणी तलावात टाकुन देण्यात आले होते. कुठलाही पुरावा नसताना अतिशय अव्हानात्मक आशा गुन्ह्याचा अकलुज पोलीसांनी अवघ्या चार तासात छडा लावुन घटनेतील दोन आरोपींना अटक केली आहे. सदर गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश.
मयत संभाजी बाबर याबाबत सविस्तर माहीती अशी की दिनांक १८/११/२०२० रोजी सायंकाळी ७.३० वा संभाजी महादेव बाबर रा.पानिव हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास गिरझणी येथिल तळ्यावर मासे पकङण्यासाठी जाळे टाकुन येतो. असे घरी सांगून गेले. ते परत घरी आलेच नाही. त्यामुळे त्यांचे भाऊ नाथाजी महादेव बाबर हे नातेवाईकांसह त्यांचा गिरझणी व अकलूज परिसरात शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. त्यानंतर संभाजी हे हरवले असल्याची तक्रार अकलूज पोलीसांत देण्यात आली.
दि. २१ नोव्हेंबर रोजी नाथाजी बाबर व विठ्ठल बाबर हे परत शोध घेण्यासाठी तळ्यावर गेले असता संभाजी यांचे प्रेत फुगुन पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले, याची माहीती लगेच अकलूज पोलीसांना देण्यात पोलीसांनी घटनास्थळी येवुन पाण्यातून प्रेत पंचांसमक्ष बाहेर काढण्यात आले. प्रेत बारकाईने पाहीले असता त्याच्या शर्टाच्या मागील बाजुस दगड भरुन शर्टाची गाठ मारलेली दिसत होती. चेहरा गोल फुगलेला व नाका तोंडातुन, ङोक्यातून रक्तसदृश्य पाणी सांडत होते. हनुवटीच्या खाली कापल्यासारखी जखम दिसत होती. आजुबाजुला शोध घेतला असता थोड्याच अंतरावर सांडलेल्या रक्तावर माती टाकुन झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत होते.
याबाबत नाथाजी महादेव बाबर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने खुन करुन त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तलावाच्या पाण्यात फेकुन दिले. म्हणून वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द भा.द.वि.सं.का. ३०२, २०१ प्रमाणे अकलूज पोलीसांत खुन झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कुठलाही ठोस पुराव व खुनाचे कारण माहीती नसल्याने सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे पोलीसांना आव्हानात्मक होते परंतु पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधिक्षक, अतुल झेंडे,सोलापूर ग्रामीण,विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी,पंढरपूर विभाग, नीरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग यांनी दिलेले मार्गदर्शक सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक,भगवान निंबाळकर हे स्वतः गिरझणी तळयावर ठाण मांडून बसून पोलीस ठाणेकडील तीन पथके तयार केली त्यामध्ये ४ अधिकारी व १९ पोलीस अंमलदार यांना देवून अज्ञात आरोपीचा व संशयीत इसमाबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून स्वतः त्यांचे बरोबर फिरुन आरोपीचा शोध घेऊन आरोपी भालचंद्र ज्योतीराम कोठावळे वय ३७ वर्षे व त्याचे सोबत एक विधी संघर्षीत बालक (अल्पवयीन) दोघे रा. पानीव ता. माळशिरस यांनी संभाजी महादेव बाबर वय ४० वर्षे रा. पानीव ता, माळशिरस हा भालचंद्र याचे पत्नीची छेड काढतो याचा आरोपी भालचंद्र याचे डोक्यात राग होता.
याच रागाच्या भरात त्याने संभाजी बाबर याचा कोयत्याने गळयावर वार करुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने व कोणास कळ नये. याकरीता त्याचे प्रेत दगड बांधुन तलावातील पाण्यात फेकुन दिले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर आरोपींना ४ तासाचे आतच पकडून त्यांना पोलीस ठाणेस आणुन त्यांचेकडे चौकशी केली असता ते पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली परंतु त्यांना अधिक विश्वासात घेवून कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.
आरोपींना माळशिरस न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना दिनांक २६/११/२०२० रोजीपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.सदर आरोपींचा शोध घेणेकामी स.पो.नि.नागेश यमगर,स.पो.नि. वैभव मारकड,पो. स.ई. दत्तात्रय पुजारी, परि,महिला पो.स.ई. सारिका शिंदे, पोलीस अंमलदार रामचंद्र चौधरी,संतोष घोगरे, मंगेश पवार, बाळासाहेब पानसरे,अमितकुमार यादव, सुभाष गोरे, हरिश्चंद्र पाटील,विश्वास शिनगारे, बबन साळुंके, प्रविण हिंगणगावकर,शिवाजी जाधव, समाधान देशमुख, शिवाजी पांढरे,निलेश काशिद, विकी घाटगे,नितीन लोखंडे,मनोज शिंदे,उमेश खराडे, पांडुरंग जाधव (संगणक कामकाज) यांनी उत्कृष्ठ कामगिरी करुन गुन्हा उघडकीस आणला आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर, अकलुज पोलीस ठाणे हे करीत आहेत.

