shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजवर्धन पाटील यांनी दाखवले माणुसकीचे दर्शन... सरपंच राहुल कांबळे..!!

खोरोची: ५/११/२०२०.खोरोची येथे जनसामान्यांचे नेतृत्व व नेहमी सुखदुःखात सामील होणारे राजवर्धन पाटील हे खोरोची गावात जाधव परिवार व भोई परिवार यांच्या येथे सांत्वन भेटीस आले असता भेट देऊन निघताना श्री सुरेश वाकसे वयोवृद्ध असणारी व्यक्ती  पॅरेलेस च्या झटक्याने आजारी असल्यामुळे ते जागेवर बसून असतात त्यात त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याचे समजतात जनसामान्यांचा नेता आज अडचणीत असणाऱ्या एका कुटुंबाला भेटण्यास जाताना त्यांनी दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य घेऊन त्यांना भेटण्यास गेले .त्यावेळी ग्रामस्थांना राजवर्धन पाटील यांचे माणुसकीचे दर्शन प्रत्यक्ष पाहण्यास मिळाल्याचे दिसून आले .धन दौलत अनेकांकडे आहे परंतु गरजू व दयनीय परिस्थितीत प्रकृतीची विचारपूस करून प्रत्यक्ष लेकरा सारखा आधार देतो तोच जनसामान्यांचा नेता असतो.  




त्यांच्या या कार्याचा प्रत्यक्ष दर्शी जनतेला त्यांचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे दिसून आले असे मनोगत सरपंच राहुल कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी विनोद सावंत, ग्रामपंचायत सदस्य, उत्तम जाधव व इत्तर कार्यकर्ते उपस्थित होते.

close