केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
रेणुका अॅग्रो इंडस्ट्रीज (गुळ उद्योग) नारेवाडी (धावज्याचीवाडी) शेतकर्यांना उसाला प्रतिटन २५०० रूपयांचा भाव देणार असल्याची माहिती संचालक अतुल (दादा) मुंडे यांनी दिली आहे.
रेणुका अॅग्रो इंडस्ट्रीज नारेवाडी (धावज्याचीवाडी) च्या ३ र्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आसून प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे.या भागातील शेतकर्यांनी कष्टाने पिकलेल्या ऊसाला अॅग्रो इंडस्ट्रीज (गुळ उद्योग) प्रतिटन २५०० रूपयांचा भाव देणार असल्याची माहिती देवगावचे उपसरपंच व रेणुका अॅग्रो इंडस्ट्रीजचे संचालक अतुल (दादा) मुंडे यांनी दिली आहे.

