सदरील कारवाई मध्ये मोठ्या प्रमाणात वायर व इतर वीजचोरी साठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
१५ शेतपंपावर अवैध रित्या विज चोरून वापरण्यात येत होती. महावितरणच्या या धडक कारवाई मुळे वीजचोरी करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
वरील कारवाई करणार्या पथकात लाईनमेन मकसूद शेख , शिवाजी घूले, रमन डीकुळे, दयानंद कावळे, विकास शिंदे, लामतुरे, व सिमा सरवदे यांचा समावेश होता.
या पूढील काळातही वीजचोरी करणार्या लोकांवर अशीच कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक अभियंता अमोल मुंडे यांनी सांगितले आहे.

