एरंडोल : येथील हायवे चौफुली नजीक अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या एरंडोल पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते अमळनेर येथून ऑनलाईन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुञसंचालन एरंडोल पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी केले. राज्याचे गृहमंञी मा.ना.अनिल देशमुख यांचे हस्ते होणारा नूतन पोलिस स्टेशन इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा ऑनलाइन माध्यमाद्वारे उपस्थितांना पाहता आला. याप्रसंगी एरंडोल तालुक्यातील विविध गणांच्या पोलिस पाटलांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन विविध गणांच्या पोलिस पाटलांचे स्वागत केले.
याप्रसंगी एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गोसावी, रविदादा पाटील, शालिकभाऊ गायकवाड, परतापराव पवार सर, किशोर पाटील कुंझरकर व इतर मान्यवरांसह शहरातील, आजूबाजुच्या ग्रामीण भागातील प्रतीष्ठीत नागरीक व पञकारांची उपस्थिती होती.
निमंञितांसाठी प्रशस्त व आरामदायक अशी बैठक व्यवस्था व चविष्ट अल्पोपहाराची व्यवस्था कार्यक्रमस्थळी एरंडोल पोलिस कर्मचार्यांकडून करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या संपन्नतेनंतर निमंञित मान्यवरांना स.पो.नि.उनवणे, स.पो.नि तुषार देवरे, गोपनिय शाखेचे संदीप सातपुते व इतर कर्मचार्यांनी नूतन व प्रशस्त ईमारतीत असलेल्या प्रत्येक सेल बाबत माहीती दिली. कोणत्या ठिकाणी कसे कामकाज असेल, पुरूष कारागृह, महीला कारागृह, गुन्हे अन्वेषण, कर्मचार्यांसाठी सुसज्ज कँन्टीन व पोलिस बिनतारी संदेश यंञणे बाबत माहीती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स.पो.निरीक्षक उनवणे, देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी परीश्रम घेतले.

