shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सण 2019-2020 मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान..!!


मुरूड। प्रतिनिधी (विकास मेहेतर):
रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुका येथिल पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा काकलघर या शाळेतील कु. मानसी संदीप नागावकर या विद्यार्थिनीने मार्च 2019 मध्ये दिलेल्या इयत्ता दहावी च्या परीक्षेमध्ये 86% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. 

महाराष्ट्र शासन - साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण , रायगड कु. मानसी संदीप नागावकर ही विद्यार्थिनी राज्य सरकार च्या सण 2019-2020 मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी पात्र ठरली असून तसा पत्र व्यवहार साहाय्यक आयुक्त समाज कल्याण,रायगड यांचेकडून पी.एन.पी.माध्यमिक शाळा काकलघर येथील मुख्याध्यापिका सौ.वंदना वसंत मेहेतर यांच्याकडे करण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत सर्वत्र कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्यामुळे सदर पुरस्कार हा रुपये पाच हजार धनादेशद्वारे  विद्यार्थिनीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे . तिच्या या यश संपादन करण्यामागे शाळेतील शिक्षक वर्ग तसेच तिचे आई वडील यांचा मोलाचा वाटा असून तिला पुढील शिक्षणासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे शिक्षकवर्गाकडून सांगण्यात आले आहे.
close