shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी कुटुंबे व्यवसायात ही आनंदाची बाब- हर्षवर्धन पाटील...!!


शेतकऱ्यांची कुटुंबे विविध उद्योग व्यवसाय धडकाने उतरत आहेत व यशस्वी होत आहेत, ही आनंदाची व कौतुकाची बाब आहे, असे गौरवोद्गार माजी सहकार मंत्री मा. हर्षवर्धन पाटील साहेब यांनी काढले. या सर्वांना आपले कायम सहकार्य राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
   



लाखेवाडी: ४/११/२०२० लाखेवाडी येथे लवकुश मंगल कार्यालयासमोर माऊली गारमेंट या भव्य कापड दालनाचे उद्घाटन मा.हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.3) सायंकाळी केले.प्रारंभी माऊली गारमेंटचे श्री माऊली उद्धव कदम व श्री नागेश महादेव माने यांनी मा. हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.
            
प्रास्ताविक युवा कार्यकर्ते के.के.अनपट यांनी केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नीरा-भीमा कारखान्याचे माजी संचालक सतीश अनपट, कुंडलिक अनपट, विष्णू जाधव, पांडुरंग माने, बापूराव भाळे, दत्तात्रय कुबडे, सोमनाथ कदम, नागेश माने, हनुमंत माने, राजेंद्र भोसले, आजिनाथ माने आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन  पाटील यांनी बीकेबीएन रस्त्याच्या लाखेवाडी हद्दीत झालेल्या दुरावस्थेची पाहणी केली.
______________________________
close