shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथील क्रांती नगरमध्ये रात्रीच्या वेळी घरात घुसून मोबाईल व पैसे घेऊन चोर फरार...!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:
रात्रीच्या वेळी एका व्यसनाधीन तरूणाने केज येथील क्रांती नगर भागातील सपना वाघमारे यांच्या घरात घुसून मोबाईल व साडेचार हजार रु ची चोरी केली.
या बाबतची माहिती अशी की केज येथील क्रांती नगर भागातील समाज मंदिराच्या पाठीमागे वाघमारे कुटुंब रहात आहे. ते उसतोडणी साठी साखर कारखान्याला गेले आहेत .   


त्यांच्या घरी त्यांची महाविद्यालयात शिक्षण घेणारी सपना वाघमारे ही मुलगी व दुसरी बाळांतणासाठी आलेली विवाहित मुलगी या दोघी घरी असताना दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री १२:०० ते १२:३० वा च्या दरम्यान अनिकेत मस्के हा युवक घरात घुसला. त्यावेळी त्या दोघी झोपेत असताना उशा जवळ ठेवलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल व लेडीज पर्स मध्ये ठेवलेले ४५०० रु अनिकेत  मस्के घेऊन फरार झाला. तो चोरी करीत असताना आवाज आल्याने सपणा व तिची बहीण जागी झाल्या .                    

आणि त्यांनी चोराला ओळखले. तसेच पळून जात असताना त्याची पायातील एक चप्पल देखील घटना स्थळावर पडलेली आहे.

या प्रकरणी सपना वाघमारे हिच्या फिर्यादी वरून सदरील आरोपी अनिकेत मस्के विरुद्ध केज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध भा. दं. वि. ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव गुजर व मंगेश भोले हे करीत आहेत.
close