केज शहरातील शिक्षक कॉलनीतील दुर्देवी घटना ....!!
केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
तिसऱ्या मजल्यावर बांधकाम करत असताना अचानक बांधकामावरील मजुराचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना केज शहरातील शिक्षक कॉलनी मध्ये मंगळवारी (दि.१७) दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शिक्षक कॉलनीतील महादेव ठोंबरे यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम चालू आहे. मंगळवारी तिसऱ्या मजल्यावर बांधकाम मजूर शेख बशीर इसाक काम करत होते. काम करत असताना अचानक शेख बशीर यांचा तोल गेल्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील मजूर हा बीड शहरातील राहणार होता व तो केज मध्ये कामानिमित्त आला होता.
या दुर्देवी घटनेने केज शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

