shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोपर्डी येथील मयत समाधान शिंदे मृत्यूप्रकरणी सी.बी. आय.चौकशीची व्हावी वंचित आघाडीची मागणी ..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर, अहमदनगर 

 कोपर्डी,ता.कर्जत. जि.अहमदनगर येथील मयत समाधान शिंदे यांचा मृत्यूप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊन गुन्हेगारास जाणीवपूर्वक अटक केली जात नाही.कारण सदर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी बरोबर कर्जत पोलिस स्टेशनचे काही पोलिसांनी देखील समाधान शिंदे यास मारहाण केलेली आहे त्या मारहाण केलेल्या आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेली आहे.तसेच ज्या पोलिसांनी समाधान शिंदे यास मारहाण केली त्या पोलिसांची चौकशी करून त्यांनाही सह आरोपी करण्यात यावे. कोपर्डी या गावातील मागासवर्गीय समाजाला पूर्वी कोपर्डीमध्ये झालेल्या घटनेमुळे टार्गेट केले जात आहे.

 पोलिसांनी गुन्हा नोंदवताना फिर्यादीची दिशाभूल करून आरोपीस अभय दिलेले आहे. त्यामुळे फिर्यादी कुटुंबास व कोपर्डीतील मागासवर्गीय समाजामध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांना हाताशी धरून गुन्ह्याचे स्वरूप बदलण्याचे काम करीत आहेत.म्हणून सदर गुन्हा सी.बी.आय कडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी,अहमदनगर दक्षिण च्या वतीने करण्यात आली आहे.

 सदर खून प्रकरणी कोपार्डी गावातील सर्व मागासवर्गीय समाज बांधव ४ ते ५ दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले आहेत.तरी उपोषणास बसलेल्यावर आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही.तरी उपोषणास बसलेल्या व्यक्तीची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा.
 तरी सुद्धा गुन्हा लवकरात लवकर सी.बी.आय कडे चौकशी कमी वर्ग करण्यात यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल,त्यापासून होणाऱ्या परिणामास प्रशासन सर्सवी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

यावेळी *मा.पोलिस अधिक्षक* आणि *मा.जिल्हाधिकारी* साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की पुढील कायदेशीर कारवाई करणार आणि आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश देखील दिले. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष मा.प्रतिक बारसे, मा.योगेश साठे, मा.जग्गू गायकवाड,आकाश शिंदे,फैररोज पठाण,अमर निर्भवणे,वैभव पारधे आदीसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
close