shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. शामसुंदर शिंदे यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळ समितीवर अशासकीय विधेयके व ठराव समितीवर निवड..!!

लोहा, कंधार (प्रतिनिधी) लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळ समितीवर नुकतीच अशासकीय विधेयके व ठराव समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे, आ. शामसुंदर शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च सभागृहात लोहा, कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आज पर्यंत च्या काळात लोहा कंधार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ,आ. शिंदे हे माजी सनदी अधिकारी असल्याने त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी, कमिशनर या महत्त्वाच्या हुद्द्यावर उत्कृष्ट प्रशासकीय सेवा कार्य केले  होते, 

आ. शिंदे यांना प्रशासकीय सेवेचा  प्रदीर्घ अनुभवाचा फायदा लोहा, कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी होत असून येणाऱ्या काळात लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचा आ. शिंदे यांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलणार हे मतदारसंघात निश्चित मानले जात आहे. आ. शिंदे यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळ समितीवर अशासकीय विधेयके व ठराव समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने लोहा ,कंधार विधानसभा मतदार संघाच्या शिरपेचात मानाचे पद आमदार शामसुंदर शिंदे यांना मिळाले असल्याने या महत्त्वाच्या पदाचा फायदा आ .शामसुंदर शिंदे हे लोहा, कंधार मतदार संघासाठी निश्चितच घेतील. आ.

 शामसुंदर शिंदे यांच्या निवडीने लोहा ,कंधार मतदार संघातील जनतेतून व सर्व स्तरातून आ शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.
close