सोनई:। प्रतिनिधी । मोहन शेगर :
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाहिनी व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी यांच्या वर सोनई येथील अमर धाम मध्ये अंत संस्कार करण्यात आले सोनई येथील ग्रामस्थानी आपला आठवडे बाजार व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी चार वाजता बसस्थानकाजवळील अमरधाममध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी झाला. युवा नेते उदयन गडाख यांनी अग्नी दिला. अंत्यविधीस जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
काल सायंकाळी नगर येथील यशवंत काॅलनीत घडलेली घटना समजल्यानंतर गाव व परीसरात शोककळा पसरली गौरी या नवरात्र सोहळा, संक्रांत उत्सवसह विविध सेवाभावी कार्यासाठी सक्रीय असायच्या. श्री स्वामी समर्थ सेवेकरी म्हणून त्यांचा अध्यात्मिक कार्यातही मोलाचा वाटा होता.
महिलांच्या हितासाठी त्या नेहमी कार्यरत असायच्या. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर संपूर्ण गाव व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे सासू,सासरे,पती,दीर, भाया व दोन मुली आहेत.
त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या तालुक्यात वहिनी नावाने प्रसिद्ध होत्या. सामाजिक कामामुळे त्यांचा स्नेहाचा लोकसंपर्क होता.

