इंदापूर प्रतिनिधी
वालचंदनगर: ८/११/२०२० वालचंद नगर येथे ( दि.७) रोजी महाराष्ट्र राज्यातील रक्त साठा तुटवड्याचा पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वालचंद नगर येथील युवक आकाश भोसले यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आज शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमास नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास वाफेचे मशीन पाण्याची जीआर व प्रेशर कुकर याचे वाटप करण्यात आले अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला असून याठिकाणी डॉ.सोमेश यावलकर यांच्या रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पाडले या शिबिरामध्ये१७७ युवकांनी रक्तदान हेच जीवनदान म्हणून रक्तदान केले या कार्यक्रमाचे आयोजन वालचंदनगर ग्रामपंचायत येथे आकाश (वस्ताद) भोसले व मित्रपरिवार वालचंदनगर यांच्यावतीने करण्यात आले अशी माहिती सागर भोसले वालचंदनगर यांनी दिली.


