shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपंचायत मध्ये दिवाळीनंतर फटाके फोडू..खा.डॉ सुजय विखे पा..!!

शिर्डी : शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून प्रत्येक गट मोर्चेबांधणी करत आहे. त्याचाच प्रत्यय आज खा.डॉ सुजय विखे पाटील शिर्डीत आल्यावर दिसून आला. महत्वाचं म्हणजे खा. विखे यांनी देखिल हे हेरलं असून आपल्या भाषणातून हसत हसत टोमणे देखिल मारले आहे.




शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद हे राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नगरप्रशासना बरोबरचं साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचं विश्वस्त पद बोनस मध्ये मिळत असल्यानं यापदासाठी अनेकांना डोहाळे लागले आहेत. ज्या नगरसवेकांना कधी विचारले जात नव्हते त्यांना आता इच्छूक उमेदवार वातानुकूलीत वाहनातून घेवून फिरतांना दिसतात. आपल्या बाजूनं किती नगरसेवक आहेत याचं शक्ती प्रदर्शन विखे पाटलांना दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आज (दि. 05) रोजी सकाळी खा. सुजय विखे शिर्डीत एका कार्यक्रमासाठी आले असताना अवर्जून हजर राहणा-यांना त्यांनी हेरलं. तसेच आपल्या भाषणातून चिमटे देखिल घेतले. “सर्व चेहरे बघितले असून त्याचा फायदा होतो की तोटो हे भविष्यात समजेल. दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी आहे, तेव्हा ‘भैय्या’ दिवाळीत वेगळे फटाके वाजवू नका”.. असा टॉन्ट देखिल त्यांनी आपल्या भाषणातून मारला.

खा. विखे पाटलांनी हसत हसत केलेल्या या विधानात बरचं काही दडलयं, नगराध्यक्ष पदासाठी सुरू असलेली मार्चेबांधणी, फोडा-फोडी, आणि जिरावा-जिरवीची भनक त्यांना देखिल लागली असावी. आणि त्यामुळचे दिवाळी नंतर नगरपंचायत मध्ये फटाके फोडू असं त्यांनी जाता जाता बोलून दाखवलं.

कुणी कितीही हवेत उड्या मारल्या तरी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय कृपादृष्टी कोणावर पडते त्यावरच आगामी नगराध्यक्षांची निवड होणार आहे. नगरपंचायत निवडणूक जरी भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले असतील तरी विखे पिता पुत्र आता भाजपात आल्यानं दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकाच छताखाली आले आहेत. तेव्हा विखे-निष्टावंता बरोबरचं भाजपच्या नगरसेवकाची मर्जी संभाळणे देखिल आ. विखे पाटलांना महत्वाचं आहे.

सध्या विद्यमान नगराध्यक्षांचा ठरलेला कार्यकाळ संपुष्ठात आल्यानं या पदासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी तसेच ग्रामस्थांमध्ये वेगवेगळ्या चर्चा ऐकावयास मिळत आहे. मागील वर्षी विद्यमान नगराध्यक्षांची नियुक्ती करताना आ. विखे यांनी नगरसेवक तथा गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, त्याप्रमाणे भाजपच्या गटातील नगरसेवकांना शब्द दिला होता. तेव्हा दिवाळी नंतर कोणाच रॉकेट उडतं आणि कुणाचा फटाका फुटतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

close