shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकर्‍यांनी जगायचे तरी कसे ? असा सवाल बबन नागरे या शेतकऱ्याने केला आहे...!!

संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप) :
शेतकऱ्यांनी आता आपली व्यथा मांडली आहे. साहेब आता आम्ही जगायचे तरी कसे ? हाच आमच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे असे भावनिक प्रतिक्रिया बबन नागरे या शेतकऱ्याने दिली आहे.
बबन नागरे या शेतकऱ्याने आपल्या २ ते ३ एकर कोथिंबिरी असलेल्या शेता मध्ये मेंढरं चरण्यासाठी सोडली व त्याचबरोबर रोटर हि मारला आहे. बबन नागरे या शेतकऱ्याने संताप व्यक्त करत  ही प्रतिक्रिया दिली आहे .

यामध्ये माझे २ लाख रुपये गेले आहे. आता मी उभा तरी रायचे कसे ? बाजार भाव पडल्याच्या या संकटाला पुढे जायचे तरी कसे ? हा मोठा प्रश्न आमच्यापुढे उपस्थित झाला आहे. हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो व या वातावरणाने व बाजार भावाने जे काही पैसे जवळ होते ते तर याच्यात घालून बसलो. मग पुढचे पीक करायचे तरी कसे? ही मोठी अडचण आमच्यापुढे निर्माण झाली आहे. जर असेच चालू राहिले तर शेतकरीवर्ग हा दीर्घकाळ जगू शकत नाही असे 
बबन नागरे यांनी संताप व्यक्त करत व्यथा मांडली आहे.
close