shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना काळात माध्यम म्हणून बजावले कर्तव्य..; सर्व सामान्य पर्यत माहिती पुरवली जनजागृती करुन भुमिका बजावली..!!

म्हणुनच तर पोलिस बॉईज एसोशिएशन ने कोरोना योध्दा या  पूरस्काराने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले !!

शिर्डी (प्रतिनिधी) - राहाता तालुक्यात कोरोना संकटात देखील माध्यम म्हणुन यशस्वी काम करणारे आर के न्युज मराठी वृत्त वाहिनीचे संपादक पत्रकार श्री राहुल कोळगे यांना पोलीस बॉईज एसोशिएशन संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य सर यांच्या हस्ते तसेच राहाता तालुका अध्यक्ष पोलिस बाॅईज असोसिएशन चे प्रविण आल्हाट व मान्यवरांच्या हस्ते कोरोना योध्दा सन्मान पत्र देत गौरविण्यात आले.

श्री राहुल कोळगे हे युवा संपादक असुन मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर मोठ्या कष्टाने व प्रामाणिक प्रयत्न करत आर के न्युज मराठी वृत्त वाहिनी सुरू केली आहे.

सर्व साधारण कुटुंबातील ही व्यक्ती असुन पत्रकारिता क्षेत्रात जिल्हा सह महाराष्ट्र भरात आपल्या कामाची छबी तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यांना या दिलेल्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने जिल्हा सह महाराष्ट्रातुन त्यांच्या हितचिंतक मित्रपरिवाराकडुन अभिनंदन केले जात आहेत तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
close