shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दरोड्याच्या तयारीतील दोघे सोनई पोलीसांकडून जेरबंद तीघे फरार..!!

प्रतिनिधी। मोहन शेगर :
सोनई : सोनई पोलीसांनी घोडेगांव येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना रविवारी सायंकाळी सडेपाचच्या सुमारास ताब्यात घेत अटक केली तर तीघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

या बाबत समजलेली अधीक माहिती अशी की, अटक केलेल्या दोघांपैकी एकजन घोडेगांवचा तर दुसरा बीडचा रहिवासी आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रविवारी सायंकाळी स.पो.नी ज्ञानेश्वर थोरात, हवलादार दत्तात्रय गावडे, पोलीस नाईक शिवाजी माने, पो.कॉ. विठ्ठल थोरात, सचिन ठोंबरे चालक हवलदार मारुती पवार असे घोडेगांव येथे पोट्रोलींग करीत असताना ज्ञानेश्वर थोरात यांना गुप्त माहिती मिळाली की, अहमदनगर ते औरंगाबाद महामार्गावर काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीने सिल्व्हर रंगाच्या स्वीफ्ट कारने येणार आहेत. 

अशी माहिती प्रभारी अधिकारी सचिन बागुल यांना दिली. त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचेआदेश दिले. मिळालेल्या माहिती प्रमाणे नमुद वर्णनाच्या कारचा घोडेगांव परिसरात शोध घेत असताना पोलीस पथकाला घोडेगांव येथील चर्च जवळ सदर वर्णनाची कार रोड वर उभी असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथक सदर कार जवळ जावुन खात्री करण्याच्या तयारीत असताना गाडीच्या चालकाने कार चालु करत पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने कारचा पाठलाग करुन ही कार घोडेगांव ग्रामिण रुग्णालयाजवळ पकडली. 

गाडीतील दोन दरोडेखोराना जागीच पकडले तसेचतीन दरोडेखोरांचा पोलीसांनी पाठलाग केला परिसरात असलेल्या काटवणाचा फायदा घेत तीन दरोडेखोर पळून गेले. पकडलेल्या दरोडेखोराचे नाव फिरोज रहेमान शेख, वय-३२ रा.घोडेगांव, आणि आगामीरखान उर्फ जावेदखान खान उर्फ लंगडा लाला जहागीरखान पठाण वय-३७, रा-बीड असे असून त्यांच्यावर बीड, जळगांव, अमरावती, अकोला, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात मालमत्ता चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पकडण्यात आलेल्या दरोडेखोरां कडून एक कार, तलवार व इत्यादी दरोडा टाकण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई श्री मनोज पाटील पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, उपविभागीय पोलीस अधिक्षक शेवगांव श्री सुदर्शन मुंढे, शनिशिंगणापुर पोलीस ठाण्याचे स.पो.नि सचिन बागुल, सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नि ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्‍यांनी केली.
close