सावळीविहीर । प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे नुकताच दारू बंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी छापा टाकुन 11 लाख 96 हजार पाचशे रुपयाचे विदेशी मध्य जप्त केले असून हा मद्य साठा करणारा आरोपी फरार आहे,याचाही शोध सध्या सुरू आहे .
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे येथील राज्य उत्पादनशुल्क उपायुक्त प्रसाद सुर्वे व अहमदनगर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सराफ, उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली संजय कोल्हे, धवल गोलेकर व इतर राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी खबर मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पद्मावती मंदिराजवळील ब्राह्मण गल्लीत एका ठिकाणी अचानक धाड टाकून येथे असलेल्या 11 लाख 96 हजार पाचशे रुपयांच्या इम्पेरियल बल्यू व्हिस्की या कंपनीच्या मद्याच्या बाटल्या चे 153 बॉक्स हस्तगत केले आहे. व ते जप्त करून संबंधित विदेशी मद्याचा साठा करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 177/ 20 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा मात्र तेथून फरार झालेला आहे, याचाही शोध चालू आहे .मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचाअवैध साठा नुकताच जप्त झाल्यामुळे मोठी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोरोणामुळे लॉक डाउन च्या काळात सर्व काही बंद होते. मात्र आता सर्व काही सुरू झाले आहे व देशी विदेशी अवैध मद्याचा साठा ही आता मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.अवैधमद्य वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत आहे व विक्रीही अवैधरित्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरू आहे ,त्यामुळे असे अवैध देशी, विदेशी मद्याचे साठे सापडत आहेत, नुकताच वांबोरी येथे सुमारे 11 लाख 96 हजार पाचशे रुपयांच्या विदेशी मद्याचा साठा जप्त केल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांचेही नागरिक अभिनंदन करत आहेत.
हा आपला छापा टाकला यासाठी संजय सराफ तसेच संजय कोल्हे यांच्याबरोबरच धवल गोलेकर त्याप्रमाणे निहाल उके ,भाऊसाहेब भोर, संजय साठे, मुकेश मुजमुले, निहाल शेख, पांडुरंग गदादे आदींनी मोठे परिश्रम घेतले ,या प्रकरणाचा तपास कोपरगावचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक निरीक्षक धवल गोलेकर हे तपास करत आहेत.

