shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी व कष्टकरी विरोधी कायदे रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करणार- विष्णु कारमपुरी महाराज

शेतकरी व कष्टकरी विरोधी कायदे रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करणार. :- विष्णु कारमपुरी (महाराज)

सोलापूर । प्रतिनिधी : दिनांक :-०८/११/२०२० 
केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी कष्टकरीच्या विरोधात केलेले कायदे त्वरीत रद्द करावे..अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल.असा ईशारा सोलापूर कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी केंद्र शासनाला एका निवेदनाद्वारे दिला आहे.

केंद्रसरकार बहुमताच्या जोरावर हुकुमशाही पध्दतीने शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विरोधात नविन कायदे पारीत केले. त्याचा विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकरी व कष्टकरी मोठ्याप्रमाणात गेल्या १० दिवसापासून आंदोलन करीत आहेत . आणि सरकारचे लक्षवेधण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे हाक दिले . त्यानुसार सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने नविन कायदे रद्द करा. अशा आशयाचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) महासंघाचे उपाध्यक्ष व जयहिंद कामगार संघटनेचे प्रमुख ॲड.सुनिल पवार, महासंघाचे सेक्रेटरी सायबण्णा तेग्गेळी, महासंघाचे सचिव व राष्ट्रीय विडी मजदुर संघटना ( इंटक ) सेक्रेटरी राहुल गुज्जर, दशरथ नंदाल, विठ्ठल कु-हाडकर, शोभा पोला, लक्ष्मीबाई ईप्पा,अंबिका पेंटा, यल्लव्वा पेंटा, यांच्यासह कामगार बंधु - भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close