नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
"नगर सोलापूर रस्त्यावरील वाहतूक खुप मोठ्या प्रमाणावर आहे विशेषतः या रस्त्यावर अवजड वाहने ये जा करत आहे या रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे आणि जर हे कामं चांगल्या प्रतिची काम केले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे."
प्रकाश पोटे
जन आधार संघटनेचे अध्यक्ष
नगर सोलापूर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत आणि झाले आहेत. यांत अनेक निष्पाप लोकांचा जिव जात आहे.अनेक प्रवाशांच्या मणक्यात गॅप पडला आहे. वाहनाचे नुकसान होतं आहे.
या रस्त्यावरील रुग्णवाहिकेतून रूग्ण ला नेत असताना नगर पर्यंत आपण जातोय का नाही असं मनात आल्या शिवाय राहत नाही. नगर सोलापूर रस्त्यावरील अपघातात अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबाचे हाल न पाहण्या सारखे आहे. अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी या नगर-सोलापूर रस्त्यावर खड्डे बुजवण्या साठी पाठपुरावा केला, आंदोलन केले. अनेक घडामोडी घडल्या आणि अखेर काम चालू झाले पण हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे दहिगाव साकत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आणि संबंधित कामगारांना काम चांगल्या प्रतिचे करावे अशी विनंती केली.
पण त्यांनी आम्हांला काम कसं करायचं ते कळतं, असं सुनावले. मग दहिगाव ग्रामस्थांनी अखेर जन आधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्याशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती दिली आणि या गंभीर प्रकरणाची दखल घेत नगर सोलापूर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची समक्ष पाहणी करून निकृष्ट दर्जाचे काम आज बंद केले आहे.जो पर्यंत हे चांगल्या प्रतिची काम होत नाही तोपर्यंत हे काम बंद राहिल असे असे संबंधीत ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर ग्रामिण चे उप अभियंता गुंड यांच्या भ्रमनधवनी वरुन अनेक वेळा संपर्क साधला.
पण कोणता हि प्रतिसाद त्यांनी दिला नाही. मग सा.बा.विभागाचे कायर्यकारी अभियंता संजय पवार यांच्याशी संपर्क करुन नगर सोलापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे याची कल्पना दिली. संबधीत अधिकार्याना चांगल्या प्रतिची काम करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. असं कळवले आहे असं आश्वासन त्यांनी दिले आहे.

