shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आई-वडील रागावल्यामुळे 13 वर्षाच्या कृष्णाने घेतला गळफास..!!


पुणे(इंदापूर):-इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावात तेरा वर्षांच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृष्णा भगवान चोरमले असे आत्महत्या केलेल्या बालकाचे नाव आहे. आई-वडील रागवल्याचा राग मनात धरुन कृष्णाने आत्महत्या केली.

बुधवारी कृष्णा घरी न सांगता परगावी फिरायला गेला. गावातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर बसून तो इंदापूरला गेला होता. याच कारणामुळे घरातल्यांनी त्याला रागवून विचारणा केली. याचाच राग मनात धरून कृष्णाने आई वडील बाहेर गेल्यानंतर गळफास घेतला. कृष्णाने कॉटवर उभे रहात साडीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला.
close