मध्यमवर्गीय कुटुंबातील तीन व्यक्तींचे भाग्य रातोरात उजळले आहे. या तिघांनी 5 कोटींचा लकी ड्रॉ अलीकडेच जिंकला.
टाळेबंदीच्या काळात काही व्यक्तींनी डोक्यावरील सुरक्षित छत गमावले, खायला अन्न उरले नाही. सुरळीत चाललेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. अनेकांनी रोजगार गमावला, लहान दुकानांवर गुजराण करणाऱ्यांवर बाजार ठप्प झाल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. तरीही चांगल्या घरातील काही मंडळींनी लॉटरीत आपला विश्वास गुंतवायचा निर्णय घेतला. याच विश्वासामुळे तीन भाग्यवंत विजेत्यांना एकाच रात्री कोट्यधीश बनवले.
मुंबईचे मणीरूल शेख कारागीर आहेत. त्यांना डिअर लॉटरीतून 1 कोटींचे बक्षीस लागले असले तरीही त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. या बक्षिसाच्या रकमेतून मुंबईत स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न ते पूर्ण करणार आहेत. शेतीची जमीनही विकत घेतील. सध्या विवाह करून आयुष्यात ‘सेटल’ होण्याच्या योजना ते आखत आहेत. ते म्हणतात, “डिअर लॉटरीने एकाच दिवसात माझे आयुष्य पालटले. मी पंधरा वर्षे काम करतो आहे. मात्र मिळालेल्या पैशातून माझी स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. डिअर लॉटरीच्या तिकिटातून एका रात्रीतच माझे नशीब बदलले, माझी स्वप्ने पूर्ण झाली.”
राजीव कुमार हे डिअर 2000 विकली लॉटरीच्या 5 कोटींचे भाग्यवान विजेते ठरले. ते लहानशा किराणा मालाच्या दुकानाचे मालक आहेत. “आता माझ्या स्वप्नांना पंख लाभले” अशा शब्दांत ते आपला आनंद व्यक्त करतात. दुकानाचा विस्तार करून व्यवसायात गुंतवणूक करून आपले ध्येय फुलवायचा त्यांचा विचार आहे. एसके साबिद हुसेन हे पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील रहिवासी. ते डिअर दिवाली बंपर लॉटरीच्या 5 कोटींच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. एक शेतकरी म्हणून आपले जीवन संपन्न होईल, हा दिलासा ते बोलून दाखवतात. सध्या आपल्या अवतीभोवतीचे शेतकरी संघर्षमय जीवन जगत असून त्यांना देखील मदत करण्याचा मानस ते व्यक्त करतात. पश्चिम बंगाल येथील बंकुरा जिल्ह्यातील देवेन्द्र आग्रवाल या वाणसामानाच्या दुकानाचे मालक आहेत. ते डिअर 2000 विकली लॉटरीचे विजेते ठरले. “मी आणि माझ्यासारख्या इतरांना डिअर लॉटरीने जगण्याची उमेद दिली यासाठी मी त्याचे आभार मानतो. मी 5 कोटींचा वापर बुद्धीने करेन आणि त्यातून निश्चितच चांगल्या गोष्टींची निर्मिती करेन.” देवेन्द्र सांगतात.
फ्युचर गेमिंगच्या डिअर लॉटरीचे उद्दिष्ट व्यक्तींची करमणूक करण्याचे असून त्यांना जगण्याची उमेद देण्याचा आहे. सध्याचा काळ संघर्षाचा आहे. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील व्यक्तींसाठी स्थिती कठीण आहे. हे लकी ड्रॉ त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवतील. व्यक्तींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ देतील. “मागील काही महिने लोकांसाठी फारच जिकीरीचे गेले. लोकांचे कल्याण करण्याच्या अनुषंगाने आपली संघटना योगदान देऊ शकते, ही जाणीव मनात आनंद निर्माण करणारी आहे. आम्ही दरदिवशी भारताला एक करोडपती देऊन व्यक्तींच्या जीवनात सकारात्मकता आणत आहोत.” असे एम अँड सी’चे व्यवस्थापकीय संचालक जोस चार्ल्स मार्टीन यांनी सांगितले.
#जगदीश का. काशिकर, *मुक्त पत्रकार व नाेकरी/लाॅ-कायदे सल्लागार
मुबंई व थाने शहर/जिल्हा.
व्हाटसअप:- 9768425757
*************

