shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"ऑलिम्पियन व भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत या शासकीय नोकरीपासून वंचित"

प्रति,
मा.संपादक 

"ऑलिम्पियन व भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत या शासकीय नोकरीपासून वंचित"

मा.महोदय.

ऑलिम्पियन व भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत ह्या अनुसूचित जमाती (ST) मध्ये मोडतात व "भारताचे प्रतिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर केले आहे व राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांमध्ये भारताचे पहिले पदक आहे तसेच आशियाई स्पर्धेत व इतर बऱ्याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतीके आहेत आणि २०१६ मध्ये रियो ओलंपिक स्पर्धेमध्ये धावण्याचा स्पर्धेत भारताकडून सहभाग नोंदविला आहे"शैक्षणिक पात्रतेत बीए असून पदवीधर आहे 

शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत थेट नियुक्ती वर्ग 1 पदासाठी पात्र असून कविता राऊत यांच्यानंतर अर्ज केलेल्या खेळाडूस शासकीय सेवेत थेट नियुक्ती वर्ग 1 मध्ये देऊन त्यास शासकीय सेवेत रुजू केले आहे व आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत पेक्षा कमी कामगिरी असलेल्या खेळाडूस मात्र प्रशासनाने वेळोवेळी विविध शासन निर्णय काढून त्यात या सेवेचा लाभ मिळवून दिला आहे परंतु आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत ह्या शासकीय सेवेत थेट नियुक्ती वर्ग 1 पदासाठी पात्र असूनही जातीय मानसिकतेतून नोकरीपासून डावलण्यात आले आहे. सदर प्रकरणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व क्रीडामंत्री सुनील जी केदार यांनी दखल ऑलिम्पियन धावपटू कविता राऊत शासकीय सेवेत थेट नियुक्ती करावी. अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (I) वतीने पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.


              अभिमन्यू सूर्यवंशी
                       अध्यक्ष
       रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (I)
        (क्रीडा विभाग - महाराष्ट्र राज्य)
close