shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दरवर्षाप्रमाणे 31 डिसेंबरला साईभक्तांसाठी श्री साईबाबा समाधी मंदिर राहणार खुले - संस्थानचे मुख्य कार्यकरी अधिकरी बगाटे

सावळीविहीर (प्रतिनिधी):
शिर्डी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर व 1 जानेवारी दरम्यान साईभक्तांची श्री साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून दरवर्षाप्रमाणे यावर्षीही गुरुवार दिनांक 31 डिसेंबर 20 20 रोजी श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरू ठेवण्यात येणार असल्याची तसेच शिर्डीत साईभक्तांची यादरम्यान अती गर्दी झाल्यास प्रवेशद्वार ४ समोर दोन रो ठेवुन श्री साईबाबां समाधी मंदिराच्या सुवर्ण कळशाचे दर्शन साईभक्तांना सुलभ व्हावे. 

त्याचप्रमाणे येथे एलईडी स्क्रीन टीव्ही लावण्यात येऊन थेट साई समाधी मंदिरातील प्रक्षेपण साई भक्तांना येथे होऊन श्री साईदर्शन  व्हावे.त्याच प्रमाणे शिर्डीत साई भक्तांची गर्दी झाल्यास अश्या ठिकाणी साई संस्थान व्यवस्थापनामार्फत गर्दीचे नियोजन करण्यासाठी ही संस्थान प्रशासन प्रयत्न करणार असून त्यासाठी संस्थानकडुन नियोजनही करण्यात आले आहे.अशी माहिती श्रीसाईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या संदर्भात आज बुधवार 30 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता  संस्थान सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे पुढे म्हणाले की ,श्री साईबाबा मंदिरात गेल्या 25 ,26 व 27 डिसेंबर 20 20 रोजी दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.तथापि मंदिरातील दर्शन क्षमता मर्यादित असल्याने शिर्डी भक्तांना श्री साई बाबांचे दर्शन करण्याची क्षमता आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. कारण सद्यस्थितीत शिर्डीत आलेल्या भक्तांची गैरसोय तर होतेच पण मंदिरा बाहेर साईभक्तांची गर्दी वाढते आहे.

या पार्श्वभूमीवर श्री साईबाबांच्या दर्शनाबाबत साईभक्तांना ऑनलाईन व बायोमेट्रिक पद्धतीने दर्शन पास दिले जाते,मात्र 31 डिसेंबर रोजी साईभक्तांची येथे गर्दी होणार आहे. त्यामुळे31 डिसेंबर रोजी रात्रभर श्री साईबाबांचे समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्यामुळे गुरुवार दिनांक 31 डिसेंबर 20 20 रोजी श्रींची शेजारती व शुक्रवार एक जानेवारी 20 21 रोजी ची काकड आरती होणार नाही. याचे सर्व साई भक्तांनी नोंद घ्यावी. तसेच दिनांक 31 डिसेंबर रोजी दर्शन रांग व मंदिर हे  covid-19 च्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी रात्री ब 11 .25 ते 11. 55 या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. 

तसेच दर्शन व्यवस्थित कोणताही बदल करण्यात आलेला नाही.याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी. तसेच  कोरोणा संदर्भातल्या संस्थान व्यवस्थापनाने साईभक्तांसाठी दिलेल्या अटी व शर्ती ही साईभक्तांनी पाळाव्यात. असेही आवाहन श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी  यावेळी पत्रकार परिषदेत केले आहे.
close