shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वप्नल फाउंडेशन पुणे च्या वतीने कौठळी च्या ऋतुजाला शैक्षणिक मदत.....शिक्षकांच्या फेसबुक पोस्ट मुळे मिळाली मदत..!!


आज दिनांक ६/१२/२०२० रोजी जि प प्राथ शाळा कौठळी या शाळेची माजी विद्यार्थिनी कु ऋतुजा राहुल वाघमारे या मुलीला स्वप्नल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने शोभा बल्लाळ यांच्या हस्ते शैक्षणिक मदत म्हणून सायकल देण्यात आली.ऋतुजा ही परिस्थितीने गरीब पण अभ्यासात हुशार असल्या कारणाने तिने कोरोना काळात शाळा बंद होत्या परंतु कोरोनावर आधारित व्हिडीओ,शिक्षक दिन,ऑनलाईन चित्रकला स्पर्धा,पंचायत समिती इंदापूर अंतर्गत च्या विविध स्पर्धा यासह अनेक विषयांवर व्हिडीओ बनवून शिक्षकांना पाठवले. शाळेचे शिक्षक भारत ननवरे सरांनी ते व्हिडीओ फेसबुक,यूट्यूब वर अपलोड केले.ते व्हिडीओ पाहून,तिचे वक्तृत्व ऐकून शोभा बल्लाळ मॅडम चा भारत ननवरे सरांना फोन आला.त्यांना सरांनी तिची सर्व परिस्थिती सांगितली मग शोभा बल्लाळ  मॅडम ने त्या मुलीला मी स्वप्नल फाउंडेशन च्या वतीने मदत करते असे सांगितले.मग सरांनी ऋतुजा ला विचारून तिला ५ वी ला शाळेत जाण्यासाठी सायकल हवी आहे असे सांगितले.मग आज त्यांनी सायकल ऋतुजाच्या घरी आणून तिला दिली.


सायकल पाहून तिला खूप आनंद झाला तो पाहून उपस्थित सर्वांनी स्वप्नल फाउंडेशन च्या या कार्याचे मन भरून कौतुक केले.यापुढेही स्वप्नल फाउंडेशन च्या माध्यमातून ऋतुजाला व अन्य गरजू मुलांना मदत करणार असल्याचे बल्लाळ मॅडम यांनी सांगितले. शिक्षकाच्या एका पोस्ट मुळे ऋतुजाला आज सायकल मिळाली. बल्लाळ मॅडम सॊबत आलेल्या संगीता क्षीरसागर यांनी देखील जय होम डेकोर व बॅग हाऊस इंदापूर च्या वतीने ऋतुजा ला एक स्कूल बॅग भेट दिली. शोभा बल्लाळ मॅडम,क्षीरसागर मॅडम व शिक्षकांचा सत्कार मोरे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला.या वेळी हामा पाटील,प्रमोद चितारे,नितीन येवले,शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी, बाळासाहेब क्षीरसागर,बाबासाहेब मोरे, ऋतुजा व तिचे कुटुंबीय उपस्थित होते.आभार बाबासाहेब मोरे यांनी मानले.*
close