लोहा । प्रतिनिधी :
आज दिनांक 10 डिसेंबर 2020 रोज गुरुवारी लोहा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित लोहा व दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन नांदेड अंतर्गत हमी भावाने धान्य उडीद, मूग ,तूर, हरभरा, ज्वारी ,सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ सोहळा मोंढा मैदान लोहा येथे लोहा ,कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे, तरी सर्व लोहा पत्रकार बांधवांनी मोंढा मैदान लोहा येथे ठीक १२.०० वाजता उपस्थित रहावे असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
सर्व पत्रकार बांधवांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

