shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त एक हजार झाडे लावण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम संपन्न..!!

इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: १० डिसें.२०. इंदापूर नगरपरिषदेच्या परिसरामध्ये इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन व इंदापूर चे नगरसेवक भरत शहा यांचा आज अभिष्टचिंतन दिवस या निमित्त विविध सामाजिक उपक्रमाद्वारे हा दिवस साजरा करण्यात येत असतो. आज इंदापूर नगरपरिषद कचरा डेपो येथे अनेक चाहत्यांच्या हस्ते एक हजार झाडे लावण्याचा पर्यावरण पूरक उपक्रम झाडे लावून साजरा करण्यात आला.


इंदापूर  नगरपरिषदेचे नगरसेवक, इंदापूर शहराचे विकास रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते. असे दिलदार व्यक्तिमत्व असणारे प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन नम्रपणे आपल्या कार्यात मग्न असणारे, इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक व त्यांच्या आईवडिलांच्या पावन स्पर्शाने व शहा परिवाराच्या परिश्रमातून उभारलेली यशस्वी शहा ब्रदर्स अँड कंपनीचे मालक यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील हजारो चाहत्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.

 यावरून त्यांचे सामाजिक,  राजकीय  ,पर्यावरणपूरक  अशा कार्यातून वेगवेगळ्या माध्यमातून जोडले गेलेल्या अनेक हितसंबंध असणारे मित्रपरिवार यांच्या आजच्या भरत शहा यांच्या बद्दल दिलेल्या शुभेच्छा पूर्वक प्रतिक्रियेतून त्यांच्या कार्याची दखल सर्वस्तरातून घेतलेली दिसून येत आहे.

आज त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त एक हजार झाडे लावण्याचा वसुंधरा या पर्यावरण पूरक कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यातून नगरपालिका परिसरात पर्यावरण पूरक असे वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. यावेळी इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक नगर परिषदेचे नागरिक व मान्यवर उपस्थित होते
close