कोरोना समुळ नष्ट होण्याचे श्री साईचरणी साकडे..!!
सावळीविहीर । राजकुमार गडकरी :
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाने मंदिर व परिसरात तोकडे कपडे घालून येऊ नये.सभ्य गणवेशात यावे. असे जे साई संस्थानने मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आवाहन केले ते योग्य असून हा चांगला निर्णय संस्थांनचा आहे.या निर्णया बद्दल समज ,गैरसमज होऊ नये. या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे. असे आवाहन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
त्यांनी नुकतीच शिर्डी येथे भेट दिली.ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांनी येथील श्री साई मंदिरात जावुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते. जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊन सर्वांना गतवैभव व जीवन प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना श्री साईबाबांच्या चरणी केल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या दिशा निर्देशांचे भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे.अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ पुढे आणखी म्हणाले की, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी नुकतेचआवाहन केले होते व फलक लावले होते व त्या नुसार मंदिर व परिसरात येताना प्रत्येकाने आपला पेहराव सभ्य असावा..कोणाच्या भावना दुखू नये, सभ्य पेहरावात आपण यावे असे आवाहन त्यांनी केले होते .कोणतीही सक्ती नव्हती. हा ऐच्छिक निर्णय आहे .मात्र समज-गैरसमजातून वेगळी चर्चा होत आहे. त्यामुळे श्री साईबाबा मंदिर व परिसरात येताना प्रत्येक नागरिकांनी पावित्र्य राखावे. कोणाच्या भावना दुखु नये. म्हणून संस्थांननी संस्थान व्यवस्थापनाकडे आलेल्या साईभक्तांच्या तक्रारीमुळे या सभ्य गणवेशातच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. तो निर्णय चांगलाच निर्णय आहे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एक प्रकारे त्यांनी भुमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांचे नाव न घेता आपण गैरसमज करु नये असा टोलाही लगावला आहे. त्याचप्रमाणे आपण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला आलो आहे .मागे आलो होतो मात्र कोरोणामुळे मंदिर बंद होते.आज श्री साईबाबांचे दर्शन घेऊन समाधान वाटले आहे व जगामध्ये जो कोरोनासारख्या महामारीचा रोग आला आहे .तो समूळ नष्ट व्हावा.पृथ्वीवरुन हा रोग कायमचा जाऊ द्या!असे श्री साईबाबांना प्रार्थना केली आहे. असे सांगत नामदार हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की ,दिवाळी पाडवा नंतर राज्यातले सर्व धर्मस्थळे आता दर्शनासाठी उघडी केली आहेत.
श्री साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. संस्थानचे कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी सांगितल्याप्रमाणे शिर्डी येथे दररोज सहा ते दहा हजार साई भक्त दर्शन येतात, कोरोणा च्या अटी व शर्ती राखत दर्शन घेतात. आत्तापर्यंत लाखो लोकांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे. मात्र आत्तापर्यंत कोणालाही साईभक्त किंवा सेवेकरी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत नाही. असे बगाटे यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे एक समाधान आहे .असे नामदार हसन मुश्रीफ यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

