shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावळीविहीर जवळील तीन-चारीवर भरधाव आयशरची ऊस वाहतूक बैलगाडीला पहाटे जोरदार धडक! बैल ठार ! मजूर गंभीर..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी) :  राहाता तालुक्यातील सावळीविहीर लगत असलेल्या तीनचारी परीसरात  नगर मनमाड रोड वरुन कोळपेवाडी कडे ऊसतोडणी साठी जाणाऱ्या बैलगाडी व चालकाला भरधाव वेगात पहाटे च्या वेळी पाठीमागून एम. एच .१२/एच/ डी/ ५४२२या भरधाव आयशरने जोराची धडक दिल्याने एक बैलांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला असून एक बैल जायबंदी झाला असून जखमी विष्णु मदन राठोड वय ३० रा चाळीसगाव याची प्रक्रृत्ती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी त्याला साईबाबा संस्थान च्या साई सुपर हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.


यासंदर्भात अधिक माहिती अशी की,
 गुरुवार दिनांक ३ डिसेबर रोजी ऊसतोडणी कामगार बैलगाडी सह कोपरगाव कडे निघाला होता. अगोदरच असलेली गरिबी व या अपघातात दोन बैलांचा झालेला दृदैवी मृत्यू व घरातील कुटुंब प्रमुखाची प्रक्रृत्ती चिंताजनक असल्याने या कुटुंबातील लोकांचा आक्रोश मनाला वेदना देणारा होता. अपघातानंतर कोळपेवाडी कारखान्याचे शेतकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी माहिती देताना सांगितले की, बैलांचा व ऊसतोडणी कामगार यांचा विमा उतरविण्यात आलेला आहे असे सांगितले. यावेळी पहाटे च्या अंधारात खराब झालेल्या नगर मनमाड महामार्ग यामुळे रोज अपघातात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या साखर कारखाने सुरू झाले असून पहाटेच ऊस तोडणी मजूर आपल्या बैलगाड्या घेऊन ऊस मळ्यात जात आहेत. मात्र या बैलगाड्यांचा लाल रिफ्लेक्टर नसतात तसेच अनेक वाहने भरधाव वेगाने पहाटे जात असतात ,त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
close