shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनेक हाल उपेक्षा सहन करण्याची वेळ,का नेहमी पारधी समाजावरच येई ?

मात्र कठीण परिस्थितीवर यशस्वीरित्या मात करण्याचं शिकवी, माता शिवराई !!
   
-माता शिवराईचा आशिर्वाद,जगातील सर्वात मोठा बहूमान - निर्माता शिवकूमार गुणवरे - 

 मुंबई (कमल के.कर्डक) -
जगाच्या पाठीवर आपला भारत  देश हा विविध जाती,धर्माच्या वेगवेगळ्या रुढी, प्रथा, परंपरांचा आणि विविध संस्कृतीने नटलेला आहे,यामध्ये काही लोकं जरी श्रीमंत असलेतरी बहुतांश मात्र आजही गरीबीच्या खाईतच आपले जीवन जगत आहेत, त्यात पारधी समाज देखील वर्षानूवर्ष असेच हलाखीचे जीवन जगत आहे,आहे मात्र या समाजाच्या नशिबी आठरावर्ष दारिद्र्य हे पाचवीलाच पुंजलेलं,त्यावर पारधी असल्याने गुन्हेगार असल्याचा माथी शिक्का,हा न जीवन जगू देणाराअसाच ठरत आहे.


पारधी समाजाच्या माणसाने कितीही इमानदारी केली तरी त्यावर विश्वास न करणे ही इतर समाजात रुजलेली घाणेरडी मानसिकता कुठेतरी बदलणे गरजेचे ठरत आहे,शेवटी कुठवर या पारधी समाजावर अन्याय करणार ?, आणि हा पारधी समाजही कुठवर अन्याय सहन करणार ?,अशी या समाजाची भयानक शोकांतिका असताना देखील माता शेवराईने अत्यंत हलाखीच्या कठीण प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीरित्या मात करुन स्वत:ची मुलं/बाळं यांनाही शिकवलं आणि इतर सामाजासही महत्वाच्या मार्गदर्शक ठरल्या आहेत,म्हणून विविध स्थरातील मान्यवरांनी त्यांच्या उज्वल आणि परोपकारी कार्यांचा गुण -गौरव नेहमीच केलेला आहे तथा शासनाने देखील त्यांच्या उतूंग कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कारही जाहिर केला आहे, खरेतर इतर समाजातील समस्त नागरीक तथा समाजसेवकांनी माता शेवराईचा आदर्श घ्यावा असेच माता शेवराईचे महान कार्य आहे.


माता शेवराईचे महान कार्याची प्रचिती जशी जशी वाढत आहे तसतसे राज्य आणि देशभरातील समाजसेवक,पत्रकार, साहित्यिक,त्यांना भेटी देत आहेत,त्या अनुषंगानेच मराठी चित्रपटाचे निर्माते/ दिग्दर्शक आणि कलाकार असलेले श्री.शिवकुमार गुणवरे यांच्यासोबत आदिवासी समाजसेवक, साहित्यिक नामदेव भोसले व जेष्ठ साहित्यिक भास्कर भोसले यांच्यासह नायगांव येथे आई शेवराईचा आर्शीवाद घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत अगोती गांवचे उपसरपंच भिमराव सदाशिव शिंदे, स्टार टी.व्ही ९चे संपादक, मराठवाडा केसरी, हिंदु सम्राट, प्रथा न्यूज इंडिया पुणे चे पत्रकार तथा अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे उपाध्यक्ष सुनिल भोसले उपस्थित होते, श्री.शिवकुमार गुणवरे यांचा माता शेवराई भोसले, सुजाता भोसले, सुरेखा भोसले, तुकाराम भोसले, यांच्याहस्ते "झाडे लावा,झाडे जगवा या मोहिमेंतर्गत एक वृक्षरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री.गुणवरे म्हणाले की,माता  शेवराईचा आशिर्वाद म्हणजे माझ्यासाठी अडचणीत योग्यवेळी संकटकाळी  ताकद निर्माण करणारा असा आहे.

हा आर्शीवाद म्हणजे माझ्या जीवणातील सर्वात मोठा बहुमान आहे,माता शेवराईने आजपर्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीरित्या मात करुन आपल्या  मुलांना व समस्त गोर-गरीब उपेक्षितांना न्याय देण्याचे धडे लहानपणापासूनच दिले आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त असलेले आदर्श समाज सेवक नामदेव भोसले व भास्कर सुनिल ,यांच्या सारखे पारधी समाजात हिरे जन्माला आले याचा आम्हा सार्थ अभिमान आहे.

राज्यातील प्रत्येक मातांनी माता शेवराईंचा आदर्श समोर ठेवत त्यांचा आदर्श घेतल्यास प्रत्येक सामाजाच्या उपेक्षा दुर होण्यासाठी जराही विल़ंब लागणार नाही शेवटी असेही शिवकुमार गुणवरे म्हणाले.
(शब्दांकन : शौकतभाई शेख- श्रीरामपूर)
मोबा.9561174111
close